ऑफिसचे टेन्शन घरी आणि घरचे टेन्शन ऑफिसमध्ये येत असेल तर नक्की वाचा

सतत मागणी करणारा बॉस आणि सहकाऱ्यांसोबत सुरू असलेली स्पर्धा पाहता ऑफिसचे काम ऑफिसमध्येच सोडून येणे तसे कठीण आहे. मेल चेक करणे किंवा फोनवर कामाबाबत बोलणे ही अशी कामे आहेत जी घरी येऊनही तुमचा मूड बिघडवू शकतात.

    जर तुम्हाला वर्क-लाईफमध्ये परफेक्ट बॅलन्स हवा असेल तर गरजेचे आहे की, घरी गेल्यानंतर स्वत:ला ऑफिसच्या कामापासून वेगळं ठेवा. तशी ही गोष्ट बोलायला जितकी सोपी आहे फॉलो करायला तितकीच कठीण आहे. जेव्हा आपण घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतो, तेव्हा ऑफिसच्या कामातून स्वत:ला वेगळे करणे फार कठीण गोष्ट ठरते.

    डेडलाइन्स आणि कॉम्पिटिशनमुळे स्थिती आणखी खराब होते. परफेक्ट बॅलन्स कठीण आहे पण काही गोष्टींची काळजी घेतली तर हे काम सोपे केले जाऊ शकते.

    प्लॅन करा
    हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. जसे करिअर गोल ठरवले जातात तसेच ऑफिस आणि घर यांच्यात बॅलन्स करण्यासाठीही गोल ठरवावे लागतात. पण गोल असे ठरवा जे फॉलो करणे सोपे जाईल. जर मित्रांसोबत काही वेळ घालवून तुम्ही रिलॅक्स फिल करत असाल तर असे करण्यास जराही निष्काळजीपणा करू नका. जर तुम्ही ऑफिसमध्ये केवळ आठ तास काम करायचे आहे आणि ओव्हरटाइम नाही करायचाय याबाबत क्लिअर रहा.

    सीमा आखून घ्या
    हे कामही कठीण आहे. सतत मागणी करणारा बॉस आणि सहकाऱ्यांसोबत सुरू असलेली स्पर्धा पाहता ऑफिसचे काम ऑफिसमध्येच सोडून येणे तसे कठीण आहे. मेल चेक करणे किंवा फोनवर कामाबाबत बोलणे ही अशी कामे आहेत जी घरी येऊनही तुमचा मूड बिघडवू शकतात. इमरजन्सीवेळी घरून काम केलेले चालते पण याची सवय लावून घ्याल तर याने तुमचे वर्क लाईफ बॅलन्स नक्कीच बिघडते.

    ऑफिस वेळेत पर्सनल कामे बंद
    सोशल मीडियाची धुंदी इतकी असते की, यावर कितीही वेळ घालवला तरी माहिती पडत नाही. याने तुमचे कामावर लक्ष केंद्रीत होत नाही आणि याने कामावर परिणाम होतो. जर आपण सोशल मीडियावर वेळ घालवत राहिलो तर अर्थातच काम वेळेत पूर्ण होणार नाही. ऑफिस वेळेत तुमचं सोशल मीडिया नोटिफिकेशन बंद ठेवाल तर योग्य होईल.

    वेळेचे महत्त्व जाणा
    जर ऑफिससाठी काही तास फिक्स केले गेले आहेत तर याचा अर्थ हा होतो की, तुम्ही वेळेवर ऑफिसला पोहोचा आणि वेळेवर काम पूर्ण करा. हे काम जरा कठीण होऊ शकते, पण अशक्य नाही.