ऑनलाईन नात्यात गुंतत असाल, तर वेळीच व्हा सावध!

या ऑनलाईच्या जगात तुम्ही एकमेकांच्या नात्यात असण्याचा विचार करत असाल, तर भावनिक गुंतागुंत होऊन तुमचे...

आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमधला दुरावा वाढतो आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियामुळे दूरचे, अनोळखी लोकं जवळ येत आहेत. अनेक जण नात्यातली ही पोकळी भरून काढण्यासाठी ऑनलाईन मित्र-मैत्रिणींना जवळ करतात. अशा अनोळखी माणसांशी ऑनलाईन ओळख करून घेणं, त्यांना भेटणं आणि त्यांच्याशी नातं जोडणं हे फारच जोखमीचं आहे. अशा अनेक सोशल साईट्स आहेत जिथे एकमेकांशी मैत्री करणं, त्यानंतर एकमेकांशी चॅटिंग करणं आणि एकमेकांना भेटणं या सगळ्या गोष्टी होतात आणि मग यानंतर भेटण्याची प्रक्रिया सुरू होते. पण तुम्ही जर या ऑनलाईन नात्यात गुंतत असाल तर वेळीच सावध व्हा! तुम्हाला याचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजू माहीत असायला हव्यात. नक्की आपण ऑनलाईन मैत्री करताना काय तपासायला पाहिजे आणि कुठे थांबायला पाहिजे हे तुम्हाला कळायला हवे. नात्यात गुंतण्याच्या आधी तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती ठेवायला हवी.

ऑनलाईन डेटिंग ॲप्स आणि वेबसाईट्सचा वापर करताना बरेच सायबर गुन्हे होताना दिसून येतात. यामध्ये फेक प्रोफाईल, सायबर शोषण, सायबर बुलिंग, सायबर डिफेमेशन, सायबर स्टॉकिंग  असे अनेक अपराध आहेत. त्यामुळे यापासून सावधान राहणं गरेजचं आहे. उगीच वाहवत जाण्यात अर्थ नाही.

या ऑनलाईच्या जगात तुम्ही एकमेकांच्या नात्यात असण्याचा विचार करत असाल, तर भावनिक गुंतागुंत होऊन तुमचे प्रोफाईल वापरून अनेक फेक प्रोफाईल बनवता येतात आणि त्याच्या सहायाने वित्तीय धोका होऊ शकतो. अर्थात तुम्हाला पैशाचा गंडा घातला जाऊ शकतो. विश्वास ठेऊन अनेक लोक अशा तऱ्हेने पैशांच्या बाबतीत फसले जातात. तसंच समोरचा व्यक्ती तुम्हाला भावनिक रित्या गुंतवून ब्लॅकमेक करून ठगबाजी करू शकतो. त्यामुळे अशा नात्यातला धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे.