जोडीदारामध्ये पुरुष शोधतात आईचे गुण; संशोधनात आले समोर

एका अभ्यासात असे लक्षात आले आहे की उशीरा लग्न करणाऱ्या स्त्रियांचे लग्न लवकर लग्न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक काळ टिकते. यामागे अनुभवाचा मोठा वाटा असतो. आजकाल एकाच्या कमाईने घर चालवणे कठीण असते. अशावेळी प्रत्येक मुलाची अशी अपेक्षा असते की त्याच्या पत्नीने नोकरी करून घरात हातभार लावावा.

    काही वर्षांपूर्वी जर एखाद्या वयस्कर स्त्रीसोबत पुरूष डेटवर जाताना दिसला तर लोक त्या स्त्रीकडे तिरप्या नजरेने बघायचे. परंतु आता तो काळ गेला. आता वयस्कर स्त्रिया कमी वयाच्या पुरुषांकडे नव्हे तर कमी वयाचे पुरूष वयस्कर स्त्रियांकडे ( old women) अधिक आकर्षक (attraction) होत असल्याचे लक्षात आले आहे. यामागे तसेच कारणही आहे. अधिक वयाच्या मुलींमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो.

    ज्या स्त्रियांचे लग्न उशीरा होते त्यांनी आयुष्यातील खाचखळगे एकट्याने सोसलेले असतात. त्यामुळे या मुलींमध्ये अधिक आत्मविश्वास असतो. प्रत्येक मुलाला एक जबाबदार पत्नी हवी असते. घरापासून बाहेरपर्यंतच्या सर्व कामांमध्ये तिने हातभार लावायला हवा. अशा मुली मुलांना अधिक आवडतात.

    एका अभ्यासात असे लक्षात आले आहे की उशीरा लग्न करणाऱ्या स्त्रियांचे लग्न लवकर लग्न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक काळ टिकते. यामागे अनुभवाचा मोठा वाटा असतो. आजकाल एकाच्या कमाईने घर चालवणे कठीण असते. अशावेळी प्रत्येक मुलाची अशी अपेक्षा असते की त्याच्या पत्नीने नोकरी करून घरात हातभार लावावा. वयस्कर स्त्रिया आपली नाती व कर्तव्याविषयी प्रामाणिक असतात. आयुष्यात अनेक अनुभव त्यांनी घेतलेले असतात. यामुळे त्यांना नात्याचे मोल कळते. प्रत्येक मुलाला वाटते की त्याची पत्नी त्याच्या आईप्रमाणे असावी.

    त्याच्यावर निःस्वार्थपणे प्रेम करणारी व त्याची काळजी घेणारी. मुलापेक्षा वयाने मोठी असलेली मुलगी आपला नवरा व कुटुंबाची काळजी उत्तमरित्या घेते.  वयस्कर स्त्रिया आपल्या जोडीदाराला संकटाच्या काळात भावनिक आधार देतात. कमी वयाच्या मुलींकडून हा आधार मिळणे कठीण ठरते. म्हणून मुले आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींच्या प्रेमात पडतात.