
व्हॅलेंटाईन डे(valentine day) जवळ आला की अनेक सिंगल लोकांना आपल्या आयुष्यात कोणीतरी जोडीदार असावा, हे वाटू लागते. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेनं एका माणसाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्याला कोणीही गर्लफ्रेंड नव्हती. मात्र यावर त्याने अनोखी शक्कल लढवली आहे.
आजपासून व्हॅलेंटाईन वीकला(valentine week) सुरूवात झाली आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाईन वीक सुरू असणार आहेत. व्हॅलेंटाईन डे(valentine day) जवळ आला की अनेक सिंगल लोकांना आपल्या आयुष्यात कोणीतरी जोडीदार असावा, हे वाटू लागते. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेनं एका माणसाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्याला कोणीही गर्लफ्रेंड नव्हती. मात्र यावर त्याने अनोखी शक्कल लढवली आहे.
या तरूणाचे नाव शकुल आहे. रिजेक्शनचा समानार्थी शब्द म्हणजे माझं नाव शकुल असं तो म्हणतो. या तरूणानं सांगितले की, “आतापर्यंत माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही. फक्त मला एकदा कोणालातरी हो बोलायचे आहे. माझ्या मित्रांना डेटवर जाताना पाहून मला वाईट वाटतं. व्हॅलेंटाईन डे आल्यावर मी गर्लफ्रेंड बनवू शकत नाही, असं जाणवायचं.”
View this post on Instagram
पुढे त्यानं सांगितले की, “ ज्यांना कुणी सोबती नाही अशा मुलींविषयी मी विचार करायला सुरुवात केली. त्यातून मला बॉयफ्रेंड ऑन रेंट ही कल्पना सुचली.मी गेल्या ३ वर्षांपासून बॉयफ्रेंड ऑन रेंट बनतो. याबाबत मी एक ऑनलाईन पोस्टसुद्धा टाकली होती. त्यात असं लिहिलं होतं की, “मी एक विचारांनी पूर्णपणे स्वतंत्र्य असलेला मुलगा आहे. व्हेलेंटाईन डे ला मी खांद्यावर डोकं ठेवण्यासाठी माझा खांदा देऊ शकतो, त्यांचा मित्र होऊ शकतो.”
शकुल शेवटी सांगतो की, सुरुवातीला लोकांनी मला वेड्यात काढलं. माझी चेष्ठा केली मात्र अनेक महिलांना माझा आधार वाटला. आतापर्यंत ४५ मुलींना मी डेट केलं आहे. त्यामुळे मला आता कधीच एकटेपणा जाणवत नाही.”