teddy day

व्हॅलेंटाईन वीकमध्ये (valentine week) आज टेडी डे (teddy day) आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला आज टेडी बेअर गिफ्ट देण्याची पद्धत आहे. मात्र टेडी बेअरची(teddy bear) कल्पना उदयाला कशी आली, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

    टेडी मग तो कोणल्याही आकाराचा का असेना लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तो हवाहवासा वाटत असतो. रविवारपासून सुरु झालेल्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये (valentine week) आज टेडी डे (teddy day) आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला आज टेडी बेअर गिफ्ट देण्याची पद्धत आहे. मात्र टेडी बेअरची(teddy bear) कल्पना उदयाला कशी आली, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थेडॉर रुझवेल्ट एकदा मिसीसिपीच्या जंगलात गेले होते. रुझवेल्ट यांना एका झाडाला जखमी अस्वल झाडाला बांधलेल्या अवस्थेत दिसलं. रुझवेल्ट यांनी लगेच अस्वलाला मुक्त केलं. ही गोष्ट वाऱ्यासारखी संपूर्ण अमेरिकेमध्ये पसरली. अमेरिकेतील एका वृत्तपत्रात कार्टुनिस्ट बेरीमेन यांनी ही घटना सांगणारं एक कार्टुन काढलं होतं, त्यातील अस्वलाचं  कार्टून लोकांना फार आवडलं.

    अस्वलाच्या कार्टुनवरून अमेरिकेतील टॉयमेकर मॉरिस मिचटॉम यांनी खेळण्यातलं कापडी अस्वल तयार केलं. या अस्वलाला त्यांनी टेडी बेअर असं नाव दिलं. कारण टेडी हे रूझवेल्ट यांचं टोपणनाव होतं. रूझवेल्ट यांनी त्या खेळण्याच्या नावाला मंजुरी दिली. त्यानंतर टेडी बेअर बाजारात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार,१९०३ साली पहिला टेडी बेअर विक्रीसाठी ठेवण्यात आला. आजतागायत हा  टेडी बेेअर सगळ्यांचा लाडका आहे.