
व्हॅलेंटाईन डे(valentine day) ला दोन-तीन दिवस बाकी राहिले आहेत. अशात आपल्या आवडत्या व्यक्तीला कोणत्या वस्तू गिफ्ट(gift for valentine day) म्हणून द्यायच्या याचा विचार तुम्ही नक्की करत असाल. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू गिफ्ट देणे हे चांगले नसते.
सध्या व्हॅलेटाईन वीक(valentine week) सुरु आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता डे सेलिब्रेट केला जात आहे. व्हॅलेंटाईन डे(valentine day) ला दोन-तीन दिवस बाकी राहिले आहेत. अशात आपल्या आवडत्या व्यक्तीला कोणत्या वस्तू गिफ्ट(gift for valentine day) म्हणून द्यायच्या याचा विचार तुम्ही नक्की करत असाल. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू गिफ्ट देणे हे चांगले नसते. काही वस्तू गिफ्ट्स दिल्याने नात्यावर वाई परिणाम होतो, असे वास्तूशास्त्र विषयातील तज्ञ सांगतात. या वस्तू कोणत्या ते आपण आज पाहूयात.
बुडणाऱ्या जहाजाचा फोटो(sinking ship)
बुडणाऱ्या जहाजाचा फोटो किंवा प्रतिकृती एखाद्याला भेट देणे चांगले नसते. जहाजाचा फोटो किंवा प्रतिकृती दिल्याने त्या व्यक्तीच्या घरात अशुभ गोष्टी घडू शकतात, असे वास्तूशास्त्र सांगते.
काळे कपडे (black dress)
कुणाला काळे कपडे चुकुनही गिफ्ट देऊ नका. काळे कपडे भेट म्हणून दिल्याने दु:खात भर पडते, असे वास्तूशास्त्र सांगते.
बूट (boot or shoes)
तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड कितीही फॅशनेबल असूदेत, त्याला किंवा तिला शूज गिफ्ट म्हणून देऊ नका. शूज दिल्याने नात्यामध्ये दुरावा निर्माण होते, असे म्हणतात.
रुमाल(handkerchief)
कधीही कुणाला भेट म्हणून रुमाल देऊ नये. रुमाल गिफ्ट म्हणून दिल्याने कपल्समधील भांडणे वाढतात.
घड्याळ(watch)
एखाद्याला घड्याळ गिफ्ट दिल्यामुळे त्याच्या प्रगतीला अडसर निर्माण होऊ शकते, असे वास्तूशास्त्र सांगते.