पत्नीला गर्भधारणा होत नाहीये मग आयुर्वेदिक डॉक्टरांचा हा सल्ला ऐका; लगेचच दिसेल परिणाम

जर एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होत नसेल (A Woman May Not Be Pregnant) तर सर्व दोष तिलाच दिला जातो, तर काही प्रकरणांमध्ये, पुरुषांच्या वीर्याचा दर्जा किंवा संख्या कमी (Decreased Quality Or Quantity Of Male Semen) असल्यामुळे, स्त्रीला गर्भधारणेमध्ये अडचण येऊ शकते. मात्र, आहाराने या समस्येवर मात (Improve Male Fertilty) करता येते.

    आता करिअर किंवा इतर कारणांमुळे कपल्स उशीरा लग्न करतात (Couples Get Married Late). उशिरा लग्न केल्याने स्त्री आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता (Fertility) कमी होण्याचा धोका असतो. शुक्राणूंच्या कमी गुणवत्तेमुळे केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही पिता बनण्यात अडचणी (Improve Male Fertilty) येतात.

    तथापि, आहारातील पोषणाचा अभाव, आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणावर परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

    जर तुम्हालाही अशी कोणतीही समस्या भेडसावत असेल, तर सर्वप्रथम तुमचा आहार बदला. आहारात काही बदल केल्याने तुमचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता मोठ्या प्रमाणात सुधारू शकते.

    पुरूष डाएटच्‍या मदतीने प्रजनन क्षमता (Fertility) कशी वाढवू शकतात. यासोबतच पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या काही टिप्स देखील सांगणार आहोत.

    शुक्राणूंची गुणवत्ता ही चिंतेची बाब आहे

    होय, जर तुम्ही कुटुंब नियोजन करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिव्हेन्शननुसार, पुरुषांसह ३५% कपल्सना वंध्यत्वाचा त्रास होतो. उशिरा लग्न झाल्यामुळे तसेच शुक्राणूंची संख्या कमी झाल्यामुळे काही जोडप्यांना प्रजनन समस्यांना (Fertility) सामोरे जावे लागत आहे.

    डाएटमुळे येणारे वंध्यत्व

    onlinelibrary.wiley.com मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार आहार, खाण्याच्या सवयी शुक्राणूंच्या गुणवत्तेशी संबंधित आहेत. या अभ्यासात असे आढळून आले की, फळे आणि भाज्या, मासे, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश केल्याने वीर्याचा दर्जा सुधारतो. या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने होती ज्यामुळे मदत होते.

    आयुर्वेदिक डॉक्टरांचे मत काय आहे

    आयुर्वेदिक डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी नवभारत टाइम्स.कॉमला दिलेल्या माहितीनुसार, अश्वगंधा, शतावरी, कौंचच्या बियांचा उपयोग पुरुषांची प्रजनन क्षमता किंवा शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो.

    काय खावे

    डॉक्टर शरद सांगतात की, तूप तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला दुधाची ॲलर्जी नसेल तर दूध नक्की प्या. आहारात काजू, बदाम आणि मनुका खा. डॉ शरद पुढे म्हणतात की, पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सर्व फळे चांगली असली तरी केळी सर्वात फायदेशीर आहे.

    सर्वप्रथम ही गोष्ट सोडा

    जर तुम्ही पिता बनू शकत नसाल आणि तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता किंवा गतिशीलता कमी असेल, जर धुम्रपान करत असाल तर, मग सर्वप्रथम ते सोडा. तंबाखूचे कोणत्याही स्वरूपात सेवन केल्याने शुक्राणूंचे नुकसान होते.

    जर तुम्हाला तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारायची असेल तर अल्कोहोल देखील सोडून द्या. याचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम होतो.