व्हर्जिनिटी आणि… टीनएजर्स का ठेवतात सिक्रेट

माणसाच्या डोक्यात प्रत्येक वयात काही बदल येतात. पौगंडावस्थेत मुलांकडून अनेक चांगल्या-वाईट गोष्टी होत असतात. टीनएजर मुले आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपले पालक व इतरांसोबत शेअर करत नाहीत. आपल्या मुलांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न पालक करतात. परंतु, मुले मात्र आपल्या मनातील गोष्टी पालकांना सांगत नाहीत. व्हर्जिनिटी हे असंच एक टीनएजर्समधील मोठं सिक्रेट आहे(Virginity and ... Secrets of Teenagers).

    माणसाच्या डोक्यात प्रत्येक वयात काही बदल येतात. पौगंडावस्थेत मुलांकडून अनेक चांगल्या-वाईट गोष्टी होत असतात. टीनएजर मुले आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपले पालक व इतरांसोबत शेअर करत नाहीत. आपल्या मुलांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न पालक करतात. परंतु, मुले मात्र आपल्या मनातील गोष्टी पालकांना सांगत नाहीत. व्हर्जिनिटी हे असंच एक टीनएजर्समधील मोठं सिक्रेट आहे(Virginity and … Secrets of Teenagers).

    व्हर्जिनिटी हे असे गुपित आहे जे प्रत्येक टीनएजर मूल लपवून ठेवते. आपल्या व्हर्जिनिटीवर कोणीही प्रश्न विचारणार नाही याची काळजी घेतात. टीनएजर मुले या वयात अनेक गोष्टी पहिल्यांदा अनुभवतात. या नवीन गोष्टी मुले कोणाशी शेअर करत नाहीत. जर शेअर करायचे असेल तरीदेखील काही खास लोकांसोबतच शेअर करतात.

    या वयात प्रेम व आकर्षण यांच्यातील फरक लक्षात येत नाही. मुले या वयात जी व्यक्ती चांगली दिसेल तिच्या प्रेमात पडतात. अशा वेळी मुले काही चुकादेखील करतात. या चुकांचा उल्लेख ही मुले कोणासमोर कधीच करत नाहीत.

    मुले आपल्या वैयक्तिक स्वच्छतेविषयी कोणाशीही बोलण्यास अनकम्फर्टेबल असतात. आपण आपली जीन्स पॅन्ट कितीतरी दिवसांपासून धुतलेली नाही, अशा गोष्टी त्यांना गुपित म्हणून ठेवायच्या असतात. टीनएजमध्ये सोशल नेटवर्किंग साईट्सचे मुलांना खास आकर्षण असते. त्यामुळे आपला आयडी, पासवर्ड व अकाउंट प्रायव्हसी सेटिंग याविषयीची माहिती ही मुले कोणाला सांगत नाहीत.