मुलींच्या मनातले ओळखायचे आहे? मग वापर या टिप्स

लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात आपल्या दिसण्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आपल्या दिसण्याकडे लक्ष द्या. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही स्कीनटाईट कपडे घालायला लागा. तुम्ही जशा आहात तशाच राहा.

  मुलीला एखादा मुलगा आवडत असेल तर त्या मुलालाही आपण आवडायला हवे असे तिला वाटते. प्रेम ही भावना आहे ते जबरदस्तीने होऊ शकत नाही. परंतु त्याच्या मनात विशेष जागा मिळवण्यासाठी तुम्ही सावकाश प्रयत्न नक्कीच करू शकता.

  खूप हसा –
  आनंदी आणि विनोदी मुली प्रत्येकालाच आवडतात. स्वतःला एकलकोंडे किंवा शांत स्वभावाचे असल्याचे दाखवू नका. त्याच्या विनोदांवर हसा आणि तुमची विनोदी बाजू त्याला दिसू द्या. हसण्याची सवय लावा.

  त्याचे म्हणणे ऐका –
  तुम्हीच एकटे बोलू नका. त्यालाही बोलू द्या. मुलांनाही स्वतःविषयी बोलायला आवडते. त्यामुळे कोणी आपले ऐकतेय हे पाहून त्यांना आनंद होतो. एखाद्या मुलाला आकर्षित करायचे असेल तर त्याचे ऐकण्यात अधिक वेळ घालवा.

  द्यायला शिका –
  नात्यात देण्याची भावना राखायला तुम्हाला आवडते हे त्याला कळू द्या. जेव्हा मुलाला लक्षात येते की तुम्ही त्याच्यासोबत कुठल्याही स्वार्थी कारणांसाठी नाहीत तेव्हा त्याला तुमची किंमत कळेल. तुम्ही खरेच त्याची काळजी करता हे त्याला कळू द्या. यामुळे तो नक्कीच तुमच्या प्रेमात पडेल.

  आधार बना –
  प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी असते जिच्यावर तो किंवा ती विसंबून राहू शकेल. तो तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो हे तुमच्या वागण्यातून त्याला दाखवून द्या. यामुळे तो तुमच्याकडे आकर्षित होईल.

  आपल्या दिसण्याकडे लक्ष द्या –
  लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात आपल्या दिसण्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आपल्या दिसण्याकडे लक्ष द्या. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही स्कीनटाईट कपडे घालायला लागा. तुम्ही जशा आहात तशाच राहा. पण त्यातच उत्तम दिसण्याचा प्रयत्न करा.

  वेगळे बना –
  त्याच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी वेगळे बना. त्याला याची जाणीव होऊ द्या की त्याच्या अवतीभोवतीच्या मुलींपेक्षा तुम्ही वेगळ्या आहात. तुम्ही सर्वोत्तम आहात असे त्याला वाटण्याचे कारण तुमच्यात असायला हवे.