५ सोमवार करा ‘हे’ व्रत; सगळ्या मनोकामना होतील पूर्ण!

घरी घेऊन आल्यानंतर उंबरठ्यावर जवळ उजव्या बाजूला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग घरात प्रवेश करायचा आहे. घरात प्रवेश केल्यानंतर जो प्रसाद आणलेला आहे हा प्रसाद घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायचा आहे.

  शिवमहापुराण आणि स्कंदपुराण या दोन्हींमध्ये उल्लेखित पशुपती व्रताबद्दल  आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वर्षभरातील कोणत्याही महिन्यातील ५ सोमवारी हे व्रत पूर्ण निष्ठेने,श्रध्देने, भक्तिभावाने जो  करतो, महादेव त्या व्यक्तींची इच्छांची पूर्तता नक्की करतात.

  तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असूद्या,मनोकामना असूद्या जिच्या अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून अपूर्ण आहेत, अतृप्त आहेत त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी वर्षातील कोणत्याही ५ सोमवारी आपण पशुपती व्रत अवश्य करा. इच्छापूर्ती करणार हे व्रत मानलं जातं.

  खरतर शिवमहापूराणात, स्कंदपुराणात याविषयीची अनेक नियम सांगितलेले आहेत. साधकाने कोणकोणत्या नियमांचे पालन करावे, कोणत्या वस्तूंचं दान करावे अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. मात्र आजच्या काळात प्रत्येकालाच या सर्व नियमांचे पालन करणे शक्य होत नाही आणि म्हणून अत्यंत साध्या सोप्या भाषेत मात्र शात्रास मान्य होईल अशाप्रकारे हे पशुपती व्रत कसं करावं याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

  कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करून देणार पशुपती व्रत, कोणत्याही प्रकारच्या सुखाची जर प्राप्ती करायची असेल, जगातील कोणतही सुख उपभोगायच असेल तर त्यासाठी सुध्दा पशुपती व्रत केलं जातं. असं कोणतंही काम नाही की जे काम पशुपती व्रत केल्यानंतर अपूर्ण राहील. त्यामध्ये यश मिळणार नाही. मात्र हे व्रत करताना काही नियमांचे पालन करावं लागतं. तेच अत्यंत मूलभूत नियम समजून घेऊया.

  हे व्रत करण्याची विधी अशी आहे की सलग ५ सोमवार आपण हे व्रत करायचं आहे. जर मधे काही अडचण आली,समस्या आली,मासिक धर्माच्या काही अडचणी आल्या तर तो सोमवार वगळून पुढील सोमवारसुध्दा आपण घेऊ शकता मनामध्ये कोणतीही शंका न आणता.

  तर सोमवारच्या दिवशी आपण लवकर उठा. स्वच्छ स्नान करा. सूर्यदेवास अर्घ्य अर्पण करा. अर्घ्य अर्पण करणे म्हणजे तांब्याभर जल दोन्ही हात उंचावून सूर्याकडे पाहत अर्पण करणे. ॐ सुर्याय नमः म्हणत. नंतर आपण शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. जाताना शिवलिंगावर ज्या ज्या गोष्टी अर्पण करतो त्या गोष्टी घेऊन जा. तांब्याभर जल घरातूनच घेऊन जा. मंदिरातील पाणी वापरू नका. आपल्या घरात आपण ज्या ज्या गोष्टीची प्राप्ती करू इच्छिता त्या घरातील जलाने आपण भगवान शंकराचा अभिषेक करायचा आहे.

  शंकराच्या पुजेमध्ये बेलपत्रांचा वापर अगदी अत्यावश्यक मानला जातो. बेलपत्र न्या. बेलपत्र पालथी घालून वहावी. अशाप्रकारे ॐ नमः शिवाय या महामंत्राचा १०८ वेळा जप करा. महिलांनी फक्त नमः शिवाय असा जप करायचा आहे. आपण पूजा करू शकता. अभिषेकही करू शकता. ज्या ज्या गोष्टी करणं आहे त्या सर्व गोष्टी करा. त्यानंतर संपूर्ण दिवसभर व्रत उपवास करायचा आहे. फलाहार करायचा आहे. जी काही फळे असतील ती फळे खाऊन संपूर्ण दिवसभर राहायचं आहे.

  त्यानंतर सायंकाळी जेव्हा सुरू मावळू लागेल त्या प्रदोष काळी पुन्हा एकदा शंकराच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करायची आहे मात्र यावेळी मंदिरात जाताना सोबत ६ तुपाचे दिवे आपण घेऊन जायचे आहेत. ते प्रज्वलित करायचे नाहीत. सोबत थोडंसं गोड साखर किंवा मिठाई घेऊन जायचं आहे आणि पुन्हा एकदा शिवलिंगाची पूजा करायची आहे.

  सकाळी जेव्हा आपण पूजा केली, अभिषेक केला तेव्हा मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील समस्या दूर करण्याची, आपली इच्छा पूर्ण करण्याची, कामात यश प्राप्त करून देण्याची प्रार्थना करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही सायंकाळी पुन्हा एकदा जाल तेव्हा पुन्हा एकदा पूजा करा आणि पाच दिवे शिवलिंगासमोर प्रज्वलित करा. जे गोड घेऊन गेला आहात त्याचे तीन हिस्से करा. दोन हिस्से शिवलिंगावर अर्पण करा. त्यातील एक भाग हा आणि एक दिवा आपण आपल्या घरी घेऊन यायचा आहे.

  घरी घेऊन आल्यानंतर उंबरठ्यावर जवळ उजव्या बाजूला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग घरात प्रवेश करायचा आहे. घरात प्रवेश केल्यानंतर जो प्रसाद आणलेला आहे हा प्रसाद घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायचा आहे. अशाप्रकारे आपण वर्षातील कोणत्याही महिन्यात सलग ५ सोमवार करायचे आहेत. प्रत्येक वेळी आपली इच्छा, मनोकामना बोलुन दाखवायची आहे.

  खरतर हे व्रत करण्यासाठी अनेक प्रकारची सामग्री असते. हे व्रत कोणीही करू शकता. तुमच्या घरात खूप गरिबी आहे,दरिद्री आहे, कोणतेही संकट असेल, एखादा महाभयंकर रोग असेल, आजार असेल कोणत्याही गोष्टीतून मुक्ती प्राप्त करण्यासाठी, इच्छांची पूर्ती करण्यासाठी आपणास हे व्रत करता येते.

  जर तुम्ही महादेव भक्ती करत नसाल, इतर देवीदेवतांची भक्ती करत असाल तरीसुद्धा आपण महादेव शरण जावू शकता. आपण ज्या देवीदेवतांची पूजा करत आहात तेसुध्दा शंकराला मानतात. जे या सृष्टीचा सांभाळ करतात श्री भगवान विष्णू हे महादेव पूजा करताना दिसतात. म्हणून मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता पशुपती व्रत अवश्य करा.