७ चमचे दह्याचा उपाय तुमच्या व्यावसाय आणि नोकरीत देईल बरकत; जाणून घ्या लाख मोलाचा उपाय

अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर जे आपण दही अर्पण केले होते ते दही आपल्या सोबत घेऊन जायचे आहे. हे घेऊन जायच्या आधी आपण बटकेश्वराणा प्रार्थना करायची आहे की उद्योग असेल धंदा असेल व्यवसाय असेल त्याची बरकत व्हावी त्यातून आपल्या घरात पैसे यावेत अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ते २ चमचे दही आपण घरात आणून..

    व्यपार असो वा नोकरी, अगदी कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणहून जर आपल्याला पैसा येत नसेल तर लक्ष्मीस खेचून आणणारा आणि आपल्या घरात वैभव, बरकत आणणारा हा एक छोटा उपाय आपण अवश्य करा. हा उपाय महादेवांशी भोलेनाथांशी संबंधित आहे. ज्या व्यक्तींनी भक्तिभावाने हा उपाय केला आहे त्यांचा व्यवसाय, नोकरी अगदी व्यवस्थित सुरु आहे. त्यांच्या घरी पैसा वैभव येऊ लागले आहे.

    हा उपाय नेमका कसा करावा. आठवड्यातील कोणत्याही दिवशी सोमवारी किंवा बुधवारी हा उपाय आपण करावा जेणेकरून त्याचा अत्यंत चांगला प्रभाव आपल्याला दिसून येतो. तर आपण नक्की काय करायचे आहे. या उपायांसाठी आपण वडाच्या झाडाखाली बसायचे आहे. मित्रांनो जे वडाचे झाड असते त्यात महादेव शंकराचा वास असतो. तर अश्या वडाच्या झाडाखाली आपण बसायचे आहे.

    बसण्यापूर्वी  आपण एक पिंपळाचे साबूत घेऊन जायचे आहे.  एक पिंपळाचे पान आणि वाटीभर दही पण आपण घेऊन जायचे आहे. त्या वडाच्या झाडाखाली सावलीखाली आपण बसायचे आहे. बसताना आपण पूर्वेला तोंड करून बसायचे आहे.

    बसल्यानंतर आपण जे पिंपळाचे पान आहे ते आपल्यासमोर ठेवा आणि त्या पिंपळाच्या पानावरती एक शिवलिंग आपल्याला तयार करायचे आहे. वडाच्या झाडाखालील मातीपासून आपण एक शिवलिंग तयार करायचे आहे. हे शिवलिंग म्हणजे साक्षात बटकेश्वर महादेव आहेत अशीश्रद्धा आपण मनात ठेवून आपण त्यांची पूजा करायची आहे.

    त्यानंतर आपण त्यावर बेलपत्र अर्पण करू शकता त्यांची विधिवत पूजा करू शकता. ते शक्य नसल्यास आपण विधिवत पूजा करून ७ चमचे दही हे त्या शिवलिंगावरती टाकून अभिषेक करायचा आहे. हे करून झाल्यानंतर पुरुषांनी ओम नमः शिवाय ! तर महिलांनी फक्त नमः शिवाय !  या महामंत्राचा जप १०८ वेळा कारायचा आहे.

    अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर जे आपण दही अर्पण केले होते ते दही आपल्या सोबत घेऊन जायचे आहे. हे घेऊन जायच्या आधी आपण बटकेश्वराणा प्रार्थना करायची आहे की उद्योग असेल धंदा असेल व्यवसाय असेल त्याची बरकत व्हावी त्यातून आपल्या घरात पैसे यावेत अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ते २ चमचे दही आपण घरात आणून आपल्या धंद्याच्या ठिकाणि तसेच जिथे काम करतो तिथे  त्या खोलीमधील उत्तरेकडील भिंतीवर एक स्वस्तिक रेखाटायचे आहे. स्वस्तिक काढताना आपण त्याच्या बाजूला दोन उभ्या रेषा रेखाटायच्या आहेत जेणेकरून आलेली लक्ष्मी घरात टिकून राहील.

    हा उपाय केल्यानंतर अगदी एक ते दोन महिन्यातच आपल्याला दिसून येईल की लक्ष्मी आपल्याकडे येण्यास सुरवात झाली आहे. आपल्याकडे पैसे येतील. आपण जे शिवलिंग बनवले होते ते उपाय झाल्यानंतर वाहत्या पाण्यात  विसर्जित करायाला विसरू नका.

    टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही.