
जर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल कार्यांमध्ये यश प्राप्त होत नसेल तर अशा वेळी पितृदोष निवारण करणे अत्यंत गरजेचे आहे व त्याचे काही विधिवत पूजा करणे सुद्धा महत्वाचे ठरते.
अक्षय तृतीय हा पितरांचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ भोजनाचा नैवैद्य दाखविला जातो. पितरांच्या सर्व कार्यांमध्ये कावळ्याला विशेष महत्व आहे. कावळ्याच्या रूपाने पितृ आपला कौल देतात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला हा एक पदार्थ अर्पण करा.
आपली पितर कावळ्याच्या रूपांमध्ये येतील आणि ही एक वस्तू ग्रहण करतील त्यामुळे आपले पित्र शांत होतील तृप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय मंगल कारक होईल. आणि त्याच बरोबर पितृदोष पासूनसुद्धा तुम्हाला मुक्तता मिळेल.
पितृदोष म्हणजे काय?
आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण कटकटी होत असेल तर ही सगळी लक्षणे पितृदोषाचे असू शकतात.
अनेकदा आपल्याकडे पैसा भरपूर असतो पण घरामध्ये सुख शांती नसते. कर्जाचे डोंगर वाढू लागते.कर्ज फेडायचे नाव घेत नाही म्हणून अनेकदा मानसिक तणाव सुद्धा निर्माण होऊ लागतो. या सगळ्या गोष्टीला पितृ दोष कारणीभूत ठरतो म्हणूनच या अक्षय तृतीयेला हा एक उपाय अवश्य करा.
अक्षय तृतीयेच्या दिवशी उपाय करताना आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे , शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर स्नानविधि उरकून संपूर्ण देवपूजा झाल्यावर आपल्याला माता महालक्ष्मीची सुद्धा पूजाविधी करायची आहे आणि देवी देवतांना नैवेद्य म्हणून धीर द्यायची आहे आणि त्याचबरोबर या खीरीमध्ये चपाती किंवा भाकरी कुस्करून आपल्या घराच्या पत्रांवर कावळ्यांना खाण्यासाठी द्यायची आहे.
ही खीर खाऊन आपले पितर शांत होणार आहेत. जेव्हा आपले पितर शांत असतात, आनंदी असतात त्यांची कृपा आपल्यावर असते. अशावेळी आपले सगळे कार्य चांगले घडते. आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते त्यांच्या कृपाप्रसादाने आपले जीवन उत्कर्षा ने भरते. जर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल कार्यांमध्ये यश प्राप्त होत नसेल तर अशा वेळी पितृदोष निवारण करणे अत्यंत गरजेचे आहे व त्याचे काही विधिवत पूजा करणे सुद्धा महत्वाचे ठरते.