कुठल्याही बदलाशिवाय वास्तुदोष करा दूर; जाणून घ्या कसे

    घराच्या प्रत्येक सजीव-निर्जीव गोष्टींमध्ये ऊर्जा (energy) सामाविली असते. ज्याचा प्रभाव घरातल्या कुटुंबियांवर होत असतो. वास्तूशास्त्रानुसा (Vastu Shastra) घरात अनेकदा वस्तू दोष असल्याचे निष्पन्न होते तेव्हा घरात बदल करणे अपेक्षित असते, परंतु बऱ्याचदा हे शक्य होत नाही. अशावेळी वास्तुदोष कसा दूर करावा याचा अनेकांना प्रश्न पडतो.

    जर आपण भाड्याच्या घरामध्ये राहत असो किंवा एखादी जुने घर आपण विकत घेतले असेल तर वास्तुदोष असेल किंवा खूप जुने घर असेल परंतु त्यावेळी वास्तुशास्त्राचा विचार केलेला नसेल तर अशा वेळी वास्तुदोष दूर करणे शक्य नसते.

    म्हणून घरात कोणतीही तोडफोड न करता फक्त काही चित्रे किंवा फोटो लावून आपण या दोषांचा प्रभाव भरपूर प्रमाणात कमी करू शकतो यामुळे संपूर्णपणे हा वास्तुदोष दूर होऊ शकणार नाही परंतु काही प्रमाणात तरी याचा दुष्परिणाम आपल्याला जाणवणार नाही त्याची तीव्रता कमी होईल.घरातील अग्नेय दिशा ही अग्नी देवाची दिशा मानली जाते आणि आपल्या घरातील अग्नी दिशा आहे असे स्थान स्वयंपाक घर मानले जाते.

    ही दिशा असलेले हे घर दुसऱ्या ठिकाणी असेल तर त्या घराला व दिशेला स्वयंपाक घर नसेल तर अशावेळी आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहत नाही. अशावेळी साधु मुनी यज्ञ करत आहेत अशा पद्धतीचा एक फोटो लावावा आणि सतत अग्नी तेवत असतो अशा ठिकाणी असलेला वास्तुदोष हळूहळू कमी होतो त्याचा प्रभाव कमी जाणवतो. ईशान्य दिशेला देवाची दिशा मानली जाते आणि अशा दिशेला जर टॉयलेट असेल तर खूप मोठा वास्तूदोष मानला जातो.

    हा दोष परिणाम आपल्यावर आपल्या परिवारावर जाणवतो म्हणुन त्याचा प्रभाव कमी करण्‍यासाठी सिंहाचा शिकार करतानाचा फोटो म्हणजे एखाद्या प्राण्याची शिकार करीत आहे असा फोटो ईशान्य दिशेला लावावा यामुळे दोषाचा प्रभाव कमी होईल. घराच्या मुख्य दाराच्या संबधित वास्तुदोष घरातील सर्वांनाच हानिकारक ठरतो आणि इतर सर्व पेक्षा मोठे व प्रशासक असावे कारण तेथूनच सर्व चांगल्या व सकारात्मक गोष्टी घरात प्रवेश करतात परंतु जर घराचे मुख्य द्वार घरातील इतर दारापेक्षा लहान असेल तर त्याला आजूबाजूला नक्षी काढावी किंवा बारीक डिझाईनच्या पट्ट्या आजूबाजूला लावावीत असे केल्याने आपले घर त्याचे द्वार मोठे दिसू लागेल आणि वास्तुदोषसुद्धा दूर होऊन जाईल.