स्वःताच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत? मग करा ‘हा’ उपाय

या उपायांमुळे तुमच्या घराचे स्वप्न साकार होईल. तुमचं घर बनण्यामध्ये जे अडथळे येत आहेत त्या दूर होतील आणि लवकरात लवकर तुमचं स्वतःच घर घेण्याची इच्छा पूर्ण होईल.

  प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की त्यांचं स्वतःच, स्वतःच्या मालकीचे,हक्काचं घर असावं आणि या घरात आपल्या कुटंबीयांसोबत आनंदात राहावं. पण प्रत्यक्षात पाहिलं तर स्वतःच घर घेणे हे खूपच मोठं आणि कठीण काम आहे. बऱ्याच लोकांचा तर संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरामध्ये जातं.

  आयुष्यभर मेहनत करून देखील त्यांच्या स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न, स्वतःचे घर असण्याची इच्छा पूर्ण होत नाही. याची बरीच कारणं असू शकतात आणि त्यामधील एक प्रमुख आणि महत्वाचं कारण म्हणजे तुमची जन्मकुंडली.

  आपण इतकी मेहनत करून देखील आपलं स्वतःच घर का होत नाही याचं उत्तर तुमच्या जन्म कुंडलीत लपलेले आहे. जन्मकुंडलीतील चतुर्थ भाव हा सूखस्थान मानला जातो. हा चतुर्थ भाव भूमी,भवन,संपत्ती यांच्याशी सबंधित असतो.या चतुर्थ भावाचा कारग्रह आणि त्यावरील अन्य ग्रहाची दृष्टी यांचा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो.

  चतुर्थ भावाचा कारग्रह मंगळ आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ शुभ आहे, बलवान आहे तर अशा व्यक्तीची अनेक घरे असतात म्हणजेच त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त स्वतःच्या मालकीची घरे असतात. याउलट जर मंगळ अशुभ असेल, कमजोर असेल तर या दोषामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घर घेत असताना अनेक अडथळे येतात,अनेक अडचणी येतात. त्यांचं घर घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं.

  ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचं स्वतःच घर तेव्हाच बनतं जेव्हा त्याच्या कुंडलीतील शनी आणि मंगळ ग्रह यांचा चतुर्थ भावाशी संबंध येतो. जर तुम्हाला देखील तुमचं स्वतःच घर बनवायचं असेल,घ्यायचं असेल पण हे घर घेत असताना तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, घराचं काम बनत नसेल तर यासाठी मंगळवारी करण्याचा एक खास उपाय आपण पाहणार आहोत.

  मंगळवार हा श्री गणेशाचा दिवस मानला जातो. श्री गणेशाची पूजा, आराधना करण्याचा दिवस मानला जातो. श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहेत. आजचा जो उपाय आहे तो आपल्याला मंगळवारी करायचा आहे. भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी अत्यंत सोपा असा हा उपाय करायचा आहे.

  मंगळवारच्या दिवशी स्नानानिधी निवृत्त झाल्यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर श्री गणेशाना प्रिय असणारे जास्वंदाचे फुल आणि दुर्वा अर्पण करायच्या आहेत. जर जास्वंदाचे फुल उपलब्ध नसेल तर तुम्ही कोणतंही लाल रंगाचे फुल अर्पण करू शकता. आणि प्रार्थना करायची की हे श्री गणेशा माझ्या घराचं श्री गणेश होऊदे म्हणजेच माझ्या घराचं स्वप्न पूर्ण होऊदे. त्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते दूर होऊ दे.

  अशाप्रकारे मनापासून श्री गणेशाना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर श्री गणेशाना गुळाचा नैवैद्य अर्पण करायचा आहे. एका वाटीमध्ये थोडासा गुळ घेऊन तो नैवैद्य म्हणून दाखवायचा आहे. यानंतर मंगळवारी दिवसभरात कधीही गो मातेला थोडासा गुळ खाऊ घालायचा आहे.

  गो मातेमध्ये ३३ कोटी देवतांचा वास असतो आणि आपल्या हिंदू धर्मात गो मातेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे या गो मातेच्या स्वरूपात ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. हे उपाय आपल्याला २१ मंगळवार करायचे आहेत. तुम्ही कुठल्याही मंगळवारी या उपायाची सुरुवात करू शकता. हा उपाय सुरू केल्यानंतर सलग २१ मंगळवार हा उपाय करायचा आहे.

  या उपायांमुळे तुमच्या घराचे स्वप्न साकार होईल. तुमचं घर बनण्यामध्ये जे अडथळे येत आहेत त्या दूर होतील आणि लवकरात लवकर तुमचं स्वतःच घर घेण्याची इच्छा पूर्ण होईल.

  (वरील माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कोणताही हेतू नाही)