
अशा परिस्थितीत, बहुतक स्त्रिया आपले उपवास कसे पूर्ण होतील याबद्दल संभमात राहतात. शास्त्रामध्ये याबद्दल काही विशेष नियम सांगितले गेले आहेत. ते नियम आज आपण जाणून घेणार आहोत.
नवरात्र उत्सव गुरुवार ७ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाला आहे. देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. तुम्हाला माहीतच असेल की नवरात्री वर्षातून दोनदा येते. एकदा चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री.
नवरात्री दरम्यान मातेच्या वेगवेगळ्या रूपांची विधिपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की जर एखादा भक्त प्रामाणिक अंतःकरणाने माता लक्ष्मीची पूजा करत असेल तर आई त्याच्यावर प्रसन्न होते आणि जीवनातील सर्व दुःख आणि त्रास दूर करते. मित्रानो नवरात्री दरम्यान लोक उपवासाच्या संबंधित नियमांचे पालन करतात. देवी भक्त नवरात्रीच्या नऊ दिवसांत व्रत, उपवास करतात.
विशेषतः स्त्रिया मोठ्या श्रद्धिने आईची पूजा करतात. नवरात्रीचे संपूर्ण ९ दिवस दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते आणि मातेची आरती , पूजा सकाळी आणि संध्याकाळी केली जाते. पण मित्रानो स्त्रियांची कोंडी तेव्हा होते जेव्हा नवरात्रीच्या दरम्यान त्यांना मासिक पाळीचा सामना करावा लागतो (If menstruation starts on the day of Navratri).
अशा परिस्थितीत, बहुतक स्त्रिया आपले उपवास कसे पूर्ण होतील याबद्दल संभमात राहतात. शास्त्रामध्ये याबद्दल काही विशेष नियम सांगितले गेले आहेत. ते नियम आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला हे माहित असले पाहिजे की जर नवरात्रीचा कलश स्थापित केला असेल तर आपण व्रत, उपवास २, ५ किंवा ७ वर्षे करणे गरजेचे असते.
एखाद्या स्त्रीने एक वर्ष व्रत उपवास केला आणि दुसऱ्या वर्षी जर मासिक पाळी मध्ये नवरात्र उत्सव आला तर बऱ्याच महिला व्रत उपवास करत नाहीत. जर नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. चला तर मग जाणून घेऊया …
जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट ब्राम्हणांदवारे द्वारे स्थापित केला जाऊ शकतो. या दरम्यान, स्त्री उपवासाच्या सर्व नियमांचे पालन देखील करू शकते. शास्त्रात असे नमूद केले आहे की जर कोणतीही स्त्री अपवित्र अवस्थेत असेल तर तिने मानसिक पूजा करावी. यामुळे व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते.
कोणताही उपवास मानसिकरित्या करता येतो. त्यावर कोणतेही बंधन नाही. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत ४ दिवस पूजा करू नका. पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात. या दरम्यान, मासिक पाळी येणाच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये. या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये. जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्या पूजा आणि हवन करू नये. या दरम्यान, कन्या पूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते.
(वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. त्याचा अंधश्रद्धेशी संबंध नाही)