घरात ‘या’ दिशेला असेल घड्याळ तर लगेच टाका काढून; वाचा वास्तुशास्त्र काय सांगते

माणसाच्या आवडीनिवडींनुसार पसंतीनुसार त्या घड्याळाची खरेदी केली जाते वास्तुशास्त्रा प्रमाणे घरातील घड्याळ कधीही तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवू नये. याबाबत असे म्हटले जाते घरातील घड्याळ किमान एक दोन मिनिटे पुढे ठेवावे तंतोतंत वेळेप्रमाणे घड्याळ ठेवल्यास...

  घर सुंदर व आकर्षक वाटावे यासाठी आपण विविध प्रकारे आपले घर सजावत असतो. अनेक गोष्टी आपण घरात ठेवतो अनेक गोष्टी आपल्या मना जवळच्या असतात काही गोष्टी गरजेच्या तर काही हाऊस म्हणून आपण घरात ठेवत असतो. मात्र अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट अशी आहे जी गरज आणि हौस म्हणून हे आपण घरात ठेवतो.

  ती म्हणजे घड्याळ अनेक रंगांची, अनेक प्रकारांची अनेक आकारांची अनेक शैलींची आणि अनेक पद्धतींची घड्याळ आपण पाहतो घड्याळ ही वस्तू मोबाईल पासून घरातील भिंतीपर्यंत अनेक ठिकाणी आपण वापरतो. मोबाईल मध्ये घड्याळ असते म्हणून अनेकांनी मनगटी घड्याळ वापरणे बंद केल्याचे अलीकडील काळात दिसून येत आहे.

  वास्तविक पाहता आपल्या आयुष्य घड्याळाच्या काट्याच्या वरच बांधले आहे. अशी आजच्या काळाची परिस्थिती आहे. मात्र घराच्या भिंतीवर लावल्या जाणाऱ्या घड्याळा विषयी वास्तुशास्त्र अनेक उपयोगी टिप्स सांगण्यात आलेला आहे वास्तविक केव्हा वेळ पाहण्यासाठी घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे दिवसाच्या कोणत्याही प्रहरात तासांमध्ये रूपांतर करून त्याप्रमाणे जीवन व्यतीत होऊ लागले.

  अगदी सगळ्या गोष्टीत घड्याळाच्या वेळे प्रमाणे करण्याची सवय अगदी सर्वांनाच लागली दिसते. मात्र आपल्या जीवनात काही समस्या असेल तर त्यामागे वेळ हा एक घटक कारणीभूत असू शकतो असे वास्तुशास्त्र सांगते इथे वेळेचा अर्थ काळ असा नसून घड्याळ आहे. वास्तुशास्त्रात काही गोष्टींचे पालन करून आपण आपली वेळ सुधारू शकतो वास्तुशास्त्रामध्ये घरातील घड्याळ यांना महत्त्वाचे स्थान आहे.

  घरातील सजावट करताना घड्याळाच्या स्थानाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास आपले लक्ष कायम दक्षिण दिशेकडे जाते त्यामुळे घरातील नकारात्मकता किंवा नकारात्मक ऊर्जा वाढू शकते म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये.

  काही जणांच्या घरात प्रत्येक खोलीत घड्याळ असते. आजच्या काळात धकाधकीचे जीवन घड्याळावर अवलंबून असते. ट्रेनची वेळ ऑफिस ची वेळ बसची वेळ गाठण्यासाठी घड्याळ उपयोगी पडत असते. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार नुकसान सोसावे लागू शकते उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यास ते सर्वोत्तम असते.

  या दिशांना घड्याळ लावल्यास सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. याशिवाय सुख-समृद्धी येते आपण विविध प्रकारची घड्याळ पाहतो अगदी काहीशे रुपयांपासून लाख रुपयांच्या घड्याळ पर्यंत च्या घड्याळ च्या किमती निश्चित केल्या जातात. काही हौशी मंडळी डायमंड, सोने यांचा वापर करून घड्याळे बनवून घेता घड्याळाची निर्मिती करणाऱ्यां कंपन्या ब्रँड बनला आहे.

  मात्र वास्तुशास्त्राप्रमाणे घरात घराच्या प्रवेशद्वारावर कधीही घड्याळ लावू नये. यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव वाढू शकतो काही वेळेस आर्थिक आघाडीवर ह्याचा परिणाम जाणवू शकतो मनगटी घड्याळ पासून डिजिटल घड्याळ पर्यंत आपण अनेक प्रकारची घड्याळे आपण दररोज पाहत असतो.

  माणसाच्या आवडीनिवडींनुसार पसंतीनुसार त्या घड्याळाची खरेदी केली जाते वास्तुशास्त्रा प्रमाणे घरातील घड्याळ कधीही तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवू नये. याबाबत असे म्हटले जाते घरातील घड्याळ किमान एक दोन मिनिटे पुढे ठेवावे तंतोतंत वेळेप्रमाणे घड्याळ ठेवल्यास जीवनात बाधा निर्माण होऊ शकतात.

  तसेच परिक्रमा इतके फळ मिळत नाही कार्यक्षेत्रात अडचणी आणि समस्या यांना सामोरे जावे लागू शकते नातेसंबंध ताणले जाऊ शकता जर घड्याळ बंद पडलेले असेल तर अशा घड्याळाचा वापर कधीही करू नये. घड्याळातील सेल संपले असतील तर लगेच दुसरे सेल टाकावे. घड्याळा मध्ये दुरुस्ती करायची असेल शक्य तितक्या लवकर लगेच दुरुस्त करावी.

  (वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार दिलेली आहे. अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)