
धर्मसिंधू ग्रंथानुसार झोपताना तोंडामध्ये पान किंवा इतर कोणतीही गोष्ट असू नये. यासोबतच टोपी किंवा पगडी घालून झोपू नये.
हिंदू धर्म ग्रंथांमध्ये झोपण्याशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. जो मनुष्य या नियमांचे पालन करत नाही त्याला आयुष्यभर विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि धनहानी होते. वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, झोपताना कधीही पाय रूमच्या दरवाजाकडे करू नयेत.
यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. अशाच प्रकाराच्या इतरही खास गोष्टी अन्य धर्म गंथांमध्ये सांगण्यात आल्या आहेत.
– विष्णू पुराणानुसार झोपताना पश्चिम किंवा उत्तर दिशेकडे पाय असावेत. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत.
– महाभारताच्या अनुशासन पर्वानुसार कधीही उष्ट्या तोंडाने झोपू नये. यामुळे रोग होतात आणि घरात दरिद्रता येते.
– मनू आणि अत्रीस्मृतीमध्ये सांगण्यात आले आहे की, ओले पाय ठेवून तसेच झोपू नये. ओल्या पायांनी झोपल्यास लक्ष्मी रुष्ट होते.
– धर्मसिंधू ग्रंथानुसार झोपताना तोंडामध्ये पान किंवा इतर कोणतीही गोष्ट असू नये. यासोबतच टोपी किंवा पगडी घालून झोपू नये.
– गौतमधर्म सूत्रानुसार विना कपडे झोपू नये. असे केल्याने दोष लागतो आणि दरिद्रता येते.