नशिबाचे दरवाजे उघडायचे असतील तर घरात ‘या’ दिशेला लावा घड्याळ

बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि याच नकारात्मक यामुळे आपले जीवनसुद्धा नकारात्मक होऊन जाते.

    वास्तू शास्त्रानुसार (Vasu shastra) प्रत्येक वस्तू आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक वस्तू आपल्या जीवनामध्ये सकारात्मक (positive) तसेच नकारात्मक (negative) बदल घडवत असते. आपल्या घरातील एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे घड्याळ. या वस्तूचा आपल्या जीवनावर खूप महत्त्वाचा प्रभाव असतो,त्या वस्तूच्या सहाय्याने आपण आपला दिनक्रम व्यतीत करत असतो. चिनी वास्तुशास्त्रानुसार घड्याळ ही अशी एकमेव वस्तू आहे जी आपल्या जीवनावर सरळ सरळ प्रभाव पाडत असते.

    आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ किंवा वाईट वेळ आणू शकतो. आपण अनेकदा एक म्हण वापरत असतो काय करणार माझी सध्या वेळेच वाईट चालू आहे असे म्हणत असतो. ज्योतिषशास्त्र वास्तूशास्त्रच्या मदतीने आपण आपलीच वाईट चाललेली वेळ चांगल्या वेळेमध्ये बदलू शकतो. भिंतीवर लावलेली घड्याळ आपल्याला वेळ दाखवतेच पण त्याच बरोबर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी सुद्धा दर्शवित असते.

    घड्याळ नेहमी चालत असते आणि कधीही न थांबण्याचा सकारात्मक संदेश घड्याळ आपल्याला देत असते म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. तुमच्या घरामध्ये घड्याळ बंद झालेली असेल तर अशा वेळी ते दुरुस्त करावी किंवा बदलून टाकावी. बंद पडलेली घड्याळ आपल्या घरात ठेवले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात.

    बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि याच नकारात्मक यामुळे आपले जीवनसुद्धा नकारात्मक होऊन जाते. भिंतीवरील घड्याळ हे नेहमी चालू असावे त्याच बरोबर वेळसुद्धा उचित असावी थोडे फार मिनिटे पुढे असले तर चालेल पण आपल्या घरी भिंतीवरील घड्याळ कधीच मागे असू नये जर आपल्या घरातील घड्याळ मागे असेल तर आपणसुद्धा जीवनामध्ये मागे मागे जात असतो. आपल्या घरातील घड्याळ आपण पूर्व पश्चिम दिशा या दिशेला लावू शकतो परंतु आपण चुकूनसुद्धा घरातील घड्याळ हे दक्षिण दिशेला लावू नये.

    (वरील माहिती वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे याचा अंधश्रधेशी संबंध नाही)