आचार्य चाणक्यांनी दिला आहे कानमंत्र; शहाणा माणूस ‘हा’ मूर्खपणा कधीच करत नाही

उत्तर आणि निर्णय नेहमी शांत मनाने विचार पूर्वक घ्यावे किंवा कोणतेही कार्य करताना. विचारपूर्वक केले तर जीवनात कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही व आपले जीवन सुखी, समृद्धी व आनंदी होईल.

  आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्री होतेच याशिवाय त्यांनी आदर्श जीवन जगण्यासाठी अनेक कानमंत्र दिले आहे, जे चाणक्य नीती म्हणून प्रसिद्ध आहे.

  सर्वसाधारण माणूस त्याच्या आयुष्यात काही मूर्खपणा करतो ज्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.

  आचार्य चाणक्य सांगतात की, आनंदात कधीही कोणालाही वचन देऊ नये आनंदाचा आपण सर्व काही विसरून जातो. आपण चांगले व वाईट याविषयी तर्क लावू शकत नाही आनंदात दिलेले हे वचन नंतर आपल्या गळ्याचा फास बनते व आपल्याला त्रासदायक ठरते म्हणून आपण आनंदात असताना कधीही कोणालाही कोणतेही वचन देऊ नये.

  दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी खूप रागात असतो अशावेळी कोणालाही उत्तर देऊ नये कारण क्रोधात आपण विवेक गमावून बसतो व काय चांगले व काय वाईट याचे आपल्याला भान राहत नाही.

  तिसरी गोष्ट कोणत्याही दुःखात कोणताही निर्णय घेऊ नये. दुःखात आपण विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. आणि दुःखी मनाने घेतलेले निर्णय नेहमी दुःख देतात. कारण जेव्हा मन दुखी असते आपण कोणत्याही गोष्टीविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि आपला तो निर्णय तो पुढे त्रासदायक ठरतो.

  उत्तर आणि निर्णय नेहमी शांत मनाने विचार पूर्वक घ्यावे किंवा कोणतेही कार्य करताना. विचारपूर्वक केले तर जीवनात कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही व आपले जीवन सुखी, समृद्धी व आनंदी होईल.