स्वयंपाक घरातल्या या ३ वस्तू कधीही संपू देऊ नका; जाणून घ्या शास्त्र

स्वयंपाक घर नेहमी भरलेले असावे. आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये. कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाक घरात असू नये. आपल्या घरात बरकत राहावी असे सर्वांनाच वाटते.

  आपले स्वयंपाक घर हे आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाक घरात जात असतो. घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या अन्नामार्फत होत असते. जर स्वयंपाक घर प्रसन्न व सकारात्मक असेल तर ती ऊर्जा संपूर्ण घराला व घराच्या सर्व सदस्यांना मिळत राहते.

  स्वयंपाक घर नेहमी भरलेले असावे. आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये. कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाक घरात असू नये. आपल्या घरात बरकत राहावी असे सर्वांनाच वाटते.

  त्यासाठी आपण विविध उपाय ही करीत राहतो आज आपण जाणून घेणार आहोत. देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णाचे आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी व घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाक घरातील अशा कोणत्या वस्तू आहे जा कधीही संपू देऊ नये.

  मीठ- आपल्या आहारामध्ये मीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक पदार्थ आहे. घरातील मीठ हे कधी संपू देऊ नये मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरात आणून ठेवावे. मीठ संपल्याने  घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे वास्तुदोष देखील होतो. त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो. तसेच घरात पैसा संदर्भात समस्या सुद्धा निर्माण होतात.

  हळद-  हळद हा मसाल्याचा पदार्थ आहे तो अन्नाची   चव, चेहऱ्यावर सौंदर्य वाढवतो. हळदीचा उपयोग पूजेत तसेच जेवणातही केला जातो तसेच प्रत्येक शुभकार्यात हळदीचा उपयोग नक्कीच होतो. भगवान विष्णू यांनासुद्धा हळद प्रिय आहे घरात हळद संपणे म्हणजे गुरु ग्रहाचा दोष लागतो.

  पीठ- स्वयंपाक घरात पीठ हा महत्वाचा घटक आहे. जर घरातले पीठ संपत आले आले असेल किंवा संपले असेल तरी पिठाच्या डब्यात थोटे तरी पीठ शिल्लक ठेवा. वास्तुशास्त्रानुसार घरातले पीठ संपल्याने तुमच्यावर समाजात अपमानित होण्याचा प्रसंग येऊ शकतो.

  तांदूळ- तांदूळ याचा उपयोग अन्नधान्य मध्ये करतातच पण कर्मकांड यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. अक्षदा नसणे म्हणजे पुजा अपूर्ण मानले जाते घरात तांदूळ संपल्यामुळे शुक्र ग्रहाचा दोष लागतो शुक्र ग्रह सुख संपत्ती साठी महत्त्वाचा मानला जातो. म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशाच्या संबंधित अडचणी निर्माण होऊ शकता.

  म्हणून घरात तांदूळ कधी संपू देऊ नका घरात तांदूळ असल्यामुळे नेहमीच पैसा टिकून राहतो म्हणूनच स्वयंपाक घरात या ३ गोष्टी नेहमी भरलेल्या असू द्या.