पितृपक्षामध्ये मुलांवरून ओवळा ही एक वस्तू; पितृदोष होईल नाहीसा

फक्त पाणी आणि तांदूळ या दोन वस्तूचा तुम्हाला भात बनवायचा आहे. शिजल्यावर तो भात एका वाटीत काढून घ्यायचा किंवा ताटलीत काढून घ्यायचा आणि आपल्या मुलांवर ओवळायचा आहे.

  पितृपक्षामध्ये (pirupaksh) आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळाले तर वर्षभर कोणताही त्रास होत नाही. दरवर्षी पितरांचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं असतं. पितरांना घास टाकण, पितरांना तर्पण देणं किंवा पितरांची सेवा करण्याची प्रथा आपल्या शास्त्रात सांगितली आहे. हे काम दरवर्षी आपल्याला पितृपक्षात करायचं असतं, तरच वर्षभर काही समस्या येत नाहीत. काही दुःख येत नाही. सर्व काम सुरळीत सुरू राहतात. म्हणून पितृपक्षात लोक दरवर्षी श्राद्ध घालतात. मंत्रजाप करतात.

  त्यासोबतच पितृपक्षात  असा एक उपाय जो महिलांनी आपल्या मुलांसाठी करावा मग मुलं कितीही मोठी असू द्या किंवा कितीही छोटी असू द्या पितृपक्षात महिलांनी आपल्या मुलांवरून ओवाळून ही एक वस्तू घरात ठेवायची आहे. हा उपाय तुम्हाला पितृपक्षात कोणत्याही दिवशी करता येईल. ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा.

  पितृपक्ष संपण्याआधी करा.तुम्हाला कोणत्याही दिवशी भात शिजवायचा आहे. थोडासा एक वाटी भात आपल्याला लागणार आहे. या हिशोबाने तुम्ही तांदूळ टाकून भात शिजवून घ्यायचे आहे. भात शिजवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की भात शिजवताना त्यामधे मीठ नाही टाकायचे, मीठ न घालता हा भात तुम्हाला शिजवायचा आहे. फक्त पाणी आणि तांदूळ या दोन वस्तूचा तुम्हाला भात बनवायचा आहे. शिजल्यावर तो भात एका वाटीत काढून घ्यायचा किंवा ताटलीत काढून घ्यायचा आणि आपल्या मुलांवर ओवळायचा आहे.

  फक्त पाणी आणि तांदूळ या दोन वस्तूचा तुम्हाला भात बनवायचा आहे. शिजल्यावर तो भात एका वाटीत काढून घ्यायचा किंवा ताटलीत काढून घ्यायचा आणि आपल्या मुलांवर ओवळायचा आहे. तुम्ही मुलांवरून ओवाळताना मुलाला  जमिनीवर बसवायचं आणि घड्याळचा काटा जसा फिरतो तसं मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत ओवाळावे.  असे तीन वेळा ओवाळून तो भात एका कागदावर किंवा कोणत्यातरी पानावर घेऊन छतावर ठेवून द्यायचा आहे. हा भात कावळे खातील, पक्षी खातील, काय फरक पडत नाही, फक्त छतावर ठेवून दयायचे आहे किंवा कुठेतरी अशा जागेवर ठेवायचे ते फक्त पक्षी खातील.

  भरपूर लोकांना घरात दोन मुलं आहेत, तीन मुले तर अशावेळी तो एकच भात तुम्ही आधी एका मुलाला बसवा, तीन वेळेस फिरवून घ्या, पुन्हा तोच भात दुसज्या मुलावर फिरवून घ्या, हा भात तुम्हाला छतावर ठेवायचा आहे. पितृदोष हे मुलांना खूप त्रास देत असतात, त्यामुळे ते कमी होण्यासाठी हे नक्की करा.

  (धार्मिक मान्यतेनुसार ही माहिती देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रध्येही संबंध नाही.)