‘या’ अनिष्ठ प्रथेच्या आड व्हायचे स्त्रियांचे लैंगिक शोषण; अशी होती ती प्रथा

या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्र देवदासी प्रथा प्रतिबंध व निर्मूलन कायदा करण्यात आला. हा कायदा अतिशय सर्व-समावेशक असून त्यात या प्रथेला प्रोत्साहन देणारी व्यक्ती कारावास व दंड अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षेला पात्र ठरविण्यात आली आहे.

    पूर्वी समाजातल्या काही ठराविक मुलींना वयात आल्यानंतर त्यांचे लग्न देवाशी लावल्या जात असे. या परंपरेला देवदासी असे म्हणतात. ही विक्षिप्त प्रथा काही असामाजिक तत्वांनी महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी बनविली होती. धार्मिक रूढींच्या नावाखाली समाजातले उच्चभ्रू पुरुष या देवदासींना आपल्या वासनेचे शिकार करीत असत.

    एखाद्या मुलीला देवदासी करताना तिला नवंकोरं लुगडं नेसवलं जातं व लाल-पांढ-या मण्यांचं ‘दर्शन’ तिच्या गळ्यात बांधलं जातं. लग्न लागल्यावर ती नवजोगतीण तिथल्याच पाच जोगतिणींसह आजूबाजूच्या पाच घरी जाऊन जोगवा मागत असे.

    या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्र देवदासी प्रथा प्रतिबंध व निर्मूलन कायदा करण्यात आला. हा कायदा अतिशय सर्व-समावेशक असून त्यात या प्रथेला प्रोत्साहन देणारी व्यक्ती कारावास व दंड अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षेला पात्र ठरविण्यात आली आहे. या कायद्यात देवदासी प्रतिबंधक अधिकारी नेमण्याची तरतूद असून त्यास देवदासी प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. तसेच राज्यस्तरावर देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी नियंत्रण मंडळ व जिल्हास्तरावर जिल्हा देवदासी निर्मूलन समिती स्थापन करण्याचीही त्यात तरतूद आहे.