Silver Peacock Idol In Your Home Can Bring Lots of Money

देवी लक्ष्मी संपन्नतेची देवता आहे. ती घरात राहण्यासाठी लोक सर्व उपाय करतात. परंतु, जर तुमच्या घरात शांतता नसेल, तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील आणि तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर, तुमच्या घरात चांदीचा मोर ठेवा. चांदीचा मोर खूप फायदेशीर मानला जातो.चांदी शुभ मानली जाते. शिवाय मोर देवतांना खूप प्रिय असल्याचेही म्हटले जाते. या कारणामुळे चांदीचा मोर घरात ठेवल्यानं सकारात्मक उर्जा तर मिळतेच. पण पैशाची कमतरताही भासत नाही, असे मानले जाते(Silver Peacock Idol In Your Home Can Bring Lots of Money).

  पैसे मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस काम करतात. काही शारीरिक श्रम करतात, काही बौद्धिक श्रम करतात. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लोक मेहनत करत राहतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्याकडे पैशाची कमतरता नसावी, असे वाटते. वास्तुशास्त्राचाही आधार घेतला जातो. घरात वास्तुशास्त्रानुसार काही बदल केल्यानंतर तुमच्या आयुष्यात आनंदच नाही तर, व्यक्तीच्या आयुष्यातून आर्थिक त्रास आणि सर्व प्रकारचे दु: खही दूर होतात, असे म्हटले जाते.
  हे करून पहा

  नाचणारा मोर करेल आर्थिक संकटावर मात

  तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल तर घरात चांदीच्या नाचणाऱ्या मोराची मूर्ती ठेवा. यामुळे पैशाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा समस्या दूर होते. वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे तणाव असतील किंवा कोणतेही वादविवाद चालू असतील तर घरात चांदीचा मोर ठेवावा. असे केल्याने तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनातील ताणही दूर होईल.
  सुख-समृद्धी वाढेल

  तुम्ही तुमच्या ड्रॉईंग रूममध्ये चांदीचा मोर ठेवला तर आनंद आणि समृद्धी वाढेल. नकारात्मकता निघून जाईल आणि घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांच्या जीवनात स्थिरता आणि शांतता आणि यश येईल. पूजेच्या ठिकाणी चांदीचा मोर ठेवल्यास दुहेरी फळ मिळते. मात्र, पूजाघरात ठेवलेल्या मोराची मूर्ती शांत स्थितीतील असावी.