The same river has to be crossed 16 times to reach Shiva temple; This secluded place can only be visited once

छत्तीसगढच्या राजनांदगाव जिल्ह्यातील घनघोर जंगलात पहाडावरील एका गहन गुहेत असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी एकच नदी 16 वेळा पार करावी लागते. हे अनोखे ठिकाण निर्जन आहे आणि वर्षातून एकदाच म्हणजे अक्षय्य तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या ठिकाणी येण्याचा मार्ग अतिशय खडतर आहेच पण हा सर्व प्रदेश नक्सली भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळेही येथे अन्य वेळी कुणी फारसे येत नाही असे सांगतात(The same river has to be crossed 16 times to reach Shiva temple; This secluded place can only be visited once).

    दिल्ली : छत्तीसगढच्या राजनांदगाव जिल्ह्यातील घनघोर जंगलात पहाडावरील एका गहन गुहेत असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी एकच नदी 16 वेळा पार करावी लागते. हे अनोखे ठिकाण निर्जन आहे आणि वर्षातून एकदाच म्हणजे अक्षय्य तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या ठिकाणी येण्याचा मार्ग अतिशय खडतर आहेच पण हा सर्व प्रदेश नक्सली भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळेही येथे अन्य वेळी कुणी फारसे येत नाही असे सांगतात(The same river has to be crossed 16 times to reach Shiva temple; This secluded place can only be visited once).

    अनेकदा चढावा लागतो पहाड

    या गुहेत जाण्याचा मार्ग इतका वळणदार आणि खडतर आहे की एकच नदी अनेकदा ओलांडावी लागते. गुहेतील शिवलिंग स्वयंभू असल्याची भावना असून त्याचे नाव मंदीपबाबा असे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या गुहेत पाणी भरते आणि थंडीच्या दिवसात शेती कामे असतात म्हणून या ठिकाणी जाता येत नाही. हा सर्व मार्ग अतिशय खडतर असून अनेकदा पहाड चढावा लागतो, उतरावा लागतो आणि गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी किमान आठ तास चालावे लागते. गुहेत आत जाऊन प्रत्यक्ष शिवलिंग दर्शन घेण्यासाठी आणखी 5-6 तासांचा अवधी लागतो. गुहेचे प्रवेशद्वार अगदी अरुंद असले तरी आतमध्ये एकावेळी 500-600 भाविक उभे राहू शकतात.

    अमरकंटककडे जातो मार्ग

    अक्षय्य तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी सर्वप्रथम ठाकूर टोला राजवंशातील लोक येथे पूजा करतात आणि मग सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेता येते. गुहेला आतमध्ये अनेक फाटे आहेत त्यामुळे हरविले जाण्याची भीती असते. येथील एक साधू सांगतात की या गुहेतून एक मार्ग प्रसिद्ध अमरकंटक या स्थळी जातो. अमरकंटक येथून 500 किमी दूर आहे. गुहा अतिशय अंधारी असून आतमध्ये दिवे उजळून प्रकाश केला जातो.