घराच्या मुख्य दारासमोर चुकूनही असू नये ‘या’ वस्तू; जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगते

घराबाहेरील वास्तूदोष ही माणसासाठी तितकेच शारीरिक,मानसिक आणि आर्थिक हानी पोहोचवणारे असतात जितके घरातील वास्तुदोष असतात. वास्तुदोष घरात असेल तर उपाय तरी केले जातात मात्र घराबाहेरील वास्तुदोष कोणकोणते असतात याची साधी माहितीही आपल्याला नसते.

  घरात वास्तुदोष असल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो मात्र घराबाहेर किंवा घरासमोर काही वस्तूंचा दोष असल्यास त्यांचा सामना घरातील व्यक्तींना करावा लागतो. म्हणून आज जाणून घेणार आहोत की घरासमोर कोणकोणत्या वस्तू ठेवू नयेत.

  घराबाहेरील वास्तूदोष ही माणसासाठी तितकेच शारीरिक,मानसिक आणि आर्थिक हानी पोहोचवणारे असतात जितके घरातील वास्तुदोष असतात. वास्तुदोष घरात असेल तर उपाय तरी केले जातात मात्र घराबाहेरील वास्तुदोष कोणकोणते असतात याची साधी माहितीही आपल्याला नसते. त्याबद्दल आपल्याला माहिती असणे फार आवश्यक असते.

  म्हणून आपण घर विकत घेत असाल किंवा स्वतःचे नवीन घर बांधून घेत असाल तर काही बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे नाहीतर आपल्या घरातील शांतता भंग पावते. घराच्या मुख्य दारासमोर किंवा घरासमोरून कोणताही सरळ रस्ता जात असेल तर तसे घर मालकासाठी अशुभ ठरते.

  घराच्या प्रवेश दारासमोर एखादा खड्डा,तलाव किंवा कोणतीही खोल जमीन असू नये. असे असल्यास घरासाठी ते अशुभ संकेत असतात. घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणताही नाला किंवा नाली असू नये. असे असेल तर त्यामुळे धनसंपत्तीची हानी होऊ शकते असा संकेत समजावा.

  घरासमोर विहीर असणे म्हणजे घरात आजारांना निमंत्रण देणे होय. घरासमोर किंवा घराच्या प्रवेद्वारासमोर कोणताही खांब असू नये. असे झाले तर तो घरातील महिलेला सतत आजारी पाडतो. मुख्य प्रवेशद्वार किंवा घरासमोर मंदिर पाहून आपल्याला आनंद होत असेल मात्र हे वास्तूच्या हिशोबाने चांगले नसते.

  घरासमोर मंदिर असेल तर आपल्या घरावर संकट आणि समस्या निर्माण होतात. घराच्या मुख्य दारासमोर पायऱ्या असू नये हे वास्तुदोषाचे एक मोठे कारण मानले जाते. म्हणून घरासमोर पायऱ्या बांधू नये किंवा विकत घेताना तसे घर विकत घेऊ नये. घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी वर दुसरा दरवाजा असू नये. यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

  (वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. कृपया अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये)