घरासमोर चुकूनही लावू नये ही झाडे; अन्यथा घरात येईल दारिद्र्य

. या झाडांमधेही  त्यांची स्वतःची ऊर्जा असते, त्यामुळे काही झाडे घरासमोर किंवा घराच्या अवती भवती लावणे कटाक्षाने टाळावे. 

    प्रत्येक गोष्टींमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असते. ज्या ऊर्जेचे स्रोत जर आपल्या जवळ असेल त्या ऊर्जेने आपण प्रभावित होते. आपल्या घराची शोभा वाढविण्यासाठी आपण घरासमोर अनेक झाडं लावतो. या झाडांमधेही  त्यांची स्वतःची ऊर्जा असते, त्यामुळे काही झाडे घरासमोर किंवा घराच्या अवती भवती लावणे कटाक्षाने टाळावे.

    या पैकी एक झाडं म्हणजे चिंचेचे. चिंचेचं झाड घराच्या परिसरात लावणे अशुभ मानले गेले आहे. नकारात्मक ऊर्जा या झाडातून विसर्जित होते. ज्याचा परिणाम कुटुंबियांच्या सदस्यांवर होतो. घरातली कमावती व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत जाऊ शकते. या अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या मिळकतीवर होऊ शकतो.

    याशिवाय बोराचे झाड अंगणात लावू नये. चिंचेच्या झाडाप्रमाणेच बोराचे झाड नकारात्मक ऊर्जा विसर्जित करते. त्यामुळे शास्त्रात या झाडाला घराच्या अंगणात लावण्यास मनाई करण्यात आली आहे.