अघोरी साधूचे हे रहस्य आहे धक्कादायक; सामान्य लोकांना नाही माहिती

सहसा स्मशानात वेळ घालवण कुणाला आवडत नाही, पण अघोरी साधू तिथेच निवास करतात व साधना करतात. मानवी मृतदेहाच्या मांसाचे भक्षण करणे, कवटीचा वापर पात्राप्रमाणे करून त्यातून अन्नग्रहण करणे. तत्सम गोष्टी अघोरी साधू करतात.

    घोर म्हणजे भीती. अ-घोरी म्हणजे असा मनुष्य की ज्याला कशाचीही भीती वाटत नाही. अघोरी साधू हे महादेव यांचे निस्सीम भक्त , उपासक आणि अनुयायी असतात. महादेव यांचे साक्षात दर्शन करणे व मोक्ष मिळवणे हे या लोकांचे एकमेव ध्येय असते. त्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा त्याग करून अघोरी साधू त्यांचे उर्वरित आयुष्य हे या साधनेला वाहून नेतात. सामान्यपणे आपला समाज ज्या गोष्टी नाकारतो, ज्या गोष्टींची घृणा करतो.

    त्या सर्व गोष्टी अघोरी साधू आपलेसे करतात. उदाहरणार्थ सहसा स्मशानात वेळ घालवण कुणाला आवडत नाही, पण अघोरी साधू तिथेच निवास करतात व साधना करतात. मानवी मृतदेहाच्या मांसाचे भक्षण करणे, कवटीचा वापर पात्राप्रमाणे करून त्यातून अन्नग्रहण करणे. तत्सम गोष्टी अघोरी साधू करतात.

    या मागे अघोरी पंथाची शिकवण आहे जी प्रत्येक गोष्टीकडे एकाच दृष्टीने पाहण्याची समज देते, मग ते चांगले असो किंवा वाईट, घृणास्पद असो किंवा सुंदर. समभावाचा प्रसार करणाऱ्या या अघोरी पंथाची सुरवात महायोगी म्हणजेच साक्षात देवांचे देव महादेव यांनी केली आहे.

    अघोरी साधू हे मान- अपमान, मोह, माया,मत्सर, काम,इर्षा, प्रेम, द्वेष या सगळ्या भावनांच्या पलीकडे गेलेले असतात. एकूणच ते वैरागी असतात. महादेव यांच्याप्रमाणे स्मशानातील भस्म ते शरीराला लावतात.

    प्रामुख्याने ते अर्धनग्न अवस्थेत असूनही त्यांना थंडी व इतर साथीच्या रोगांची लागन होत नाही, याचे श्रेय ते अंगाला लावलेल्या भस्माला देतात. भस्म हे आपले शरीर कसे नश्वर आहे आणि मृत्यू हेच कसे अंतिम सत्य आहे याची प्रचिती देते.