Shivling

शिव पुराणातील(shiv puran) वर्णनानुसार, शिवलिंग म्हणजे शंकराच्या निराकार रुपाचे प्रतीक आहे. शिवरात्रीच्या वेळी प्रकट झालेल्या शिवलिंगाची सगळ्यात आधी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्याकडून पूजा करण्यात आली होती.

    येत्या ११ मार्चला महाशिवरात्र(mahasivratri) आहे. दरवर्षी शंकरभक्त अतिशय भक्तीभावाने महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्तांमध्ये(shivbhakt) एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. या दिवशी शंकराच्या पूजेसाठी खास तयारी केली जाते. मात्र शिवलिंगाचे रहस्य काय आहे? महाशिवरात्र साजरी करण्यामागचे कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

    शिवलिंग म्हणजे काय?
    शिव पुराणातील वर्णनानुसार, शिवलिंग म्हणजे शंकराच्या निराकार रुपाचे प्रतीक आहे. शिवरात्रीच्या वेळी प्रकट झालेल्या शिवलिंगाची सगळ्यात आधी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्याकडून पूजा करण्यात आली होती. वातावरणासह फिरणाऱ्या ब्रह्मांडाचा अंश म्हणजे शिवलिंग होय. त्यामुळे याचा उगम आणि अंत याबाबत फारशी माहिती नाही.

    सौरमंडलातील ग्रहांच्या फिरण्याची कक्षा म्हणजे शंकराच्या शरीरावरील सर्प आहे. मुंडकोपनिषदानुसार सूर्य,चंद्र आणि अग्नी हे शंकराचे तीन डोळे आहेत. संपूर्ण ब्रह्मांड त्यांचे शरीर आहे. डोक्यावरील गंगा जल तत्वाचं प्रतीक आहे. भगवान शंकर संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहेत. स्कंद पुराणानुसार आकाश स्वयंलिंग आहे. पृथ्वी त्यांची पाठ म्हणजे आधार आहे. सगळ्याची सुरुवात शुन्यातून होते आणि शून्यातच सगळ्याचा अंत होतो. त्यामुळे त्याला लिंग म्हटले जाते.

    maha-shivratri
    महाशिवरात्रीची कथा
    पौराणिक ग्रंथानुसार, सतीचा पार्वतीच्या रुपात पुनर्जन्म झाला होता. देवी पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र शंकर प्रसन्न झाले नाही. मात्र त्रियुगी नारायणापासून ५ किलोमीटर दूर गौरीकुंडामध्ये कठीण ध्यान आणि साधना करुन पार्वतीने शंकराचे मन जिंकले. महाशिवरात्रीच्या दिवशीच शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला. याच दिवशी वैराग्य सोडून भगवान शंकरांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला.

    शिवभक्त महाशिवरात्रीला संपूर्ण रात्र शंकराचे गुणगान करतात. या दिवशी शंकराचे लग्न झाल्याचा पौराणिक संदर्भ असल्याने शंकराची वरातही काढली जाते. रात्री पूजा करुन फलाहार केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीच्या व्रताची सांगता होते.