
दारात शिंकले तर घरातल्या वडीलधाऱ्या लोकांनी टोकल्याचे अनेकांनी अनुभवले असेल, परंतु त्यामागचे कारण विचारल्यास ते स्वतःही काही समाधारक उत्तर देऊ शकले नसतील. दारात शिकणे किंवा दारात बसने यावरून अनेकांनी टोकले जाते. यामागे एक आख्यायिका सांगण्यात येते. ती अशी आहे.
हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा श्री विष्णू यांचा भक्त होता. आणि हे राक्षसी भावना असणाऱ्या वडीलांना रूचत नव्हते. त्यांनी प्रल्हादाला अनेक प्रकारे या भक्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण झाले ऊलटेच, प्रल्हादाची श्रद्धा वाढतच गेली. प्रत्येक कणाकणात भगवंत म्हणजे श्री विष्णू आहेत हे प्रल्हादाचे म्हणणे आजमविण्यासाठी हिरण्यकश्यपू ने जवळील खांबावर प्रहार केला. आणि भगवंत श्री नरसिंह रूपात प्रकट झाले. भगवंताने नरसिंहरूप का धारण केले? तर हिरण्यकश्यपूला ब्रम्हदेवाचे वरदान होते. ते वरदान खालीलप्रमाणे होते.
१)त्याचा मृत्यु निसर्ग निर्मित घटकांपासून (ब्रम्हदेवाने केलेल्या भुतांपासून /घटकांपासून) होऊ नये.
२) मृत्यू घरात किंवा घराबाहेर होणार नाही.
३) मृत्यू दिवसा किंवा रात्री होणार नाही.
४) मृत्यू शस्राने किंवा अस्राने होणार नाही.
५) मृत्यू जमिनीवर किंवा आकाशात होणार नाही.
६) मृत्यू देव , दानव , मानव , इतर कोणाकडुनही प्राप्त होणार नाही.
या वरदानामुळे अजेय हिरण्यकश्यपूला मारण्यास श्री विष्णू यांनी चवथा अवतार श्री नरसिंह यांचा घेतला.
१) खांब तोडताच त्यातून श्री नरसिंह बाहेर पडले.
२) देह देव , दानव , मानव , पशू यांचा नव्हता तर मनुष्य आणि प्राणी याची सरमिसळ होती.
३) सायंकाळची वेळ म्हणजे दिवस /रात्र नव्हती.
४) त्यांनी हिरण्यकश्यपूस ऊचलून ऊंबरठ्यावर बैठक मारली म्हणजे घरात नाही घराबाहेर नाही. आकाशात नाही आणि जमिनीवर नाही.
५) नखांनी पोट फाडुन वध केला म्हणजेच शस्र नाही वा अस्र नाही.
तर असे हे संतापलेले नरसिंह सायंकाळी ऊंबरठा / ऊंबऱ्या चा ऊपयोग असुरास मारण्यासाठी करतात. त्यामुळे या जागेस परंपरागत महत्व आहे. त्यांचा रोष आपल्या कुटुंबियांवर होऊ नये म्हणून.
सायंकाळी ऊंबऱ्यावर बसु नये , शिंकु नये असे म्हणतात. आणि असे केल्यास पाणी टाकतात ज्यामुळे त्यांचा होणारा संताप शांत होईल. थोडक्यात सांयकाळी ऊंबरा किंवा ऊंबरठा हे स्थान श्री नरसिंह भगवंताचे मानतात.
(वरील माहिती धार्मिक दृष्टिकोनातून दिलेली आहे. अंधश्रद्धा परविण्याचा कुठलाच हेतू नाही)