फोटो साभार गुगल
फोटो साभार गुगल

उड्डाण म्हणजे उडणे किंवा तरंगणे. तुमचं वजन, वजनकाट्यावर सत्तर किलो दाखवते पण तुम्हाला स्वतः ला त्या सत्तर किलोचे  जडत्व जाणवते का?

  तुम्ही जर एखाद्या अंतयात्रेत (funeral) पार्थिव शरीराला खांदा दिला असेल तर एक बाब नक्कीच ध्यानात आली असेल, ती म्हणजे मृत (death)शरीराचे वजन हे कमालीचे वाढलेले असते. यामागे अनेक जण वेगवेगळी करणे देण्यात येतात. यापैकी एक कारण म्हणजे  आपले शरीर हे पंचप्राण म्हणजे पाच वायूंनी बनलेले आहे.

  १)समान वायू

  २)प्राण वायू

  ३)उड्डाण वायू

  ४)अपान वायू

  ५)व्यान वायू

  उड्डाण वायू:

  उड्डाण म्हणजे उडणे किंवा तरंगणे. तुमचं वजन, वजनकाट्यावर सत्तर किलो दाखवते पण तुम्हाला स्वतः ला त्या सत्तर किलोचे  जडत्व जाणवते का? नाही जाणवत. आपण सत्तर किलो असूनही सहज वावरतो,पळतो, उड्या मारतो, सगळी कामे करतो. हे शक्य होते ते शरीरातील उड्डाण वायूमुळे. उड्डाण वायूमुळे एक तरण शक्ती निर्माण होते जी आपला पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण भार कमी करते.

  मृत्यूनंतर म्हणजेच श्वास थांबल्यानंतर सहा ते बारा तासात उड्डाण वायू शरीरातून निघून जातो.एकदा का उड्डाण वायू शरीरातून निघून गेला की त्या सोबत तरण शक्ती ही जाते, आणि अचानक शरीर जड होते. मृत शरीराचे वजन वाढत नाही फक्त उड्डाण वायू निघून गेल्याने वजन जाणवू लागते. म्हणूनच जिवंत आणि मृत व्यक्ती उचलताना वजनाचा फरक प्रकर्षाने जाणवतो.