
गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2021)काळात मोदकाचा(Modak) नैवेद्य दाखवला जातो. मात्र गणपती बाप्पाला मोदक आवडण्यामागे काय कारणे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ?
गणेशोत्सवाचा(Ganeshotsav 2021) सण सगळीकडे आनंदाने साजरा केला जातो. यावेळी गणेशोत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणपतीला मोदक आवडतात त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मोदकाचा(Modak) नैवेद्य दाखवला जातो. मात्र गणपती बाप्पाला मोदक आवडण्यामागे काय कारणे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ?
गणपतीला मोदक प्रिय असल्याबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत. पहिल्या कथेनुसार, एकदा भगवान शिव झोपले होते आणि गणेश जी दरवाजावर पहारा देत होते. जेव्हा परशुराम तेथे पोहोचला, गणपतीने परशुरामला थांबवले. यावर परशुराम चिडले आणि त्यांनी गणपतीसोबत लढाई सुरू केली. जेव्हा परशुराम पराभूत होऊ लागला, तेव्हा त्याने शिव शंकरानी दिलेल्या परशुने गणपतीवर हल्ला केला. यामुळे गणपतीचा एक दात तुटला. तुटलेल्या दातांमुळे त्याला खूप वेदना जाणवू लागल्या आणि खाण्यापिण्यात त्रास होऊ लागला. मग त्यांच्यासाठी मोदक तयार केले गेले. कारण मोदक खूप मऊ असतात. मोदक खाल्ल्याने त्याचे पोट भरले आणि तो खूप आनंदी झाला. तेव्हापासून मोदक गणपतीला आवडू लागला असे मानले जाते. असे मानले जाते की जो कोणी त्याला मोदक अर्पण करतो, गणपती त्याच्यावर प्रसन्न होतो.
अन्य एका आख्यायिकेनुसार,असं म्हटलं जातं की एकदा गणपती भगवान शिव आणि माता पार्वतीसोबत अनुसुयाच्या घरी गेले. त्यावेळी गणपती, भगवान शिव आणि माता पार्वती या तिघांना खूप भूक लागली होती. माता अनुसूयाने विचार केला की आधी मी गणपतीला खायला घालते. त्यानंतर महादेव आणि माता पार्वतीला खाऊ घालते. जेव्हा माता अनुसूयाने गणपतीला खायला द्यायला सुरुवात केली, तेव्हा तो बराच वेळ खात राहिला. पण त्याची भूक भागत नव्हती. मग अनुसूयाने विचार केला की काहीतरी गोड खाल्ल्याने त्याची भूक शमू शकते. अशा परिस्थितीत आई अनुसूया गणपतीसाठी मिठाईचा तुकडा घेऊन आली. तो खाल्ल्याबरोबरच गणपतीचे पोट भरले आणि त्यांनी जोरात फुंकर मारली. त्याचवेळी शंकरानेही तृप्तीने २१ ढेकर दिले. नंतर देवी पार्वतीने अनुसूयाला त्या गोडाचे नाव विचारले. माता अनुसूयाने सांगितले की त्याला मोदक म्हणतात. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ मानला जातो आणि गणपतीला मोदक अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. असे मानले जाते की जर गणपतीला २१ मोदक अर्पण केले गेले तर सर्व देवतांचे पोट भरते. यासह, गणपती आणि इतर सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.