…म्हणून अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री प्रवास टाळावा; जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान काय सांगते

पृथ्वीच्या मुळात 2 प्रकाराच्या शक्ती असतात. सकारात्मक आणि नकारात्मक, दिवस आणि रात्र, चांगले आणि वाईट. पृथ्वीवर दोन्ही शक्ती आप आपले वर्चस्व गाजवतात. काही अश्या मिश्रित शक्ती देखील असतात, जसे की संध्याकाळ होते जे दिवस आणि रात्रीच्या मध्ये असते. या मध्ये दिवसाचे गुण देखील असतात आणि रात्रीचे गुण देखील असतात. अश्या प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक शक्ती आणि अवसेच्या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त करून सक्रिय राहतात.

    पौर्णिमेच्या विज्ञान:
    1  पौर्णिमेच्या रात्री मन अस्वस्थ राहतं आणि झोप देखील कमी येते. दुर्बळ मनाचे लोकांमध्ये आत्महत्या किंवा खून करण्याचे विचार वाढतात. शास्त्रज्ञांच्या मते या दिवशी चंद्राचा प्रभाव तीव्र असतो या कारणामुळे शरीरात रक्तामधील न्यूरॉन पेशी सक्रिय होतात आणि अश्या स्थितीत व्यक्ती अत्यधिक उत्तेजित आणि भावनिक असतो. अशा मनस्थितीत प्रवास केल्यास अपघाताचा धोका बळावतो.

    2 ज्यांना अपचनाचा आजार असतो किंवा ज्यांचा पोटात चय-उपचय क्रिया शिथिल होते, तेव्हा असे ऐकण्यात येते की अश्या माणसांना जेवल्यावर नशा केल्याची अनुभूती होते. आणि अशावेळी त्यांचे न्यूरान्स पेशी शिथिल होतात जेणे करून मेंदूचा ताबा शरीरापेक्षा मनावर जास्त होतो. अश्या माणसांवर चंद्राचा प्रभाव चुकीची दिशा घेतो. या कारणासाठी पौर्णिमेचा उपवास धरण्याचा सल्ला दिला जातो.

    3 चंद्र पृथ्वीच्या पाण्याशी निगडित आहे. पौर्णिमेचा काळात समुद्रात भरती येते कारण चंद्र हा समुद्राच्या पाण्याला वर ओढतो. मानवाच्या शरीरामध्ये सुमारे 85 टक्के पाणी असतं. पौर्णिमेच्या दिवशी या पाण्याचा वेग आणि गुणधर्ण बदलतात.

    अमावस्येचे विज्ञान :
    1 अमावास्येच्या दिवशी भुतं- प्रेतं, पितर निशाचर प्राणी आणि राक्षस अत्यधिक क्रियाशील आणि मुक्त असतात. अश्या दिवसाचे स्वरूप बघूनच सावधगिरी बाळगली पाहिजे.

    2 ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राला मनाचे देव मानले गेले आहे. अवसेला चंद्र दृष्टीस येत नाही. अश्या वेळेस जे लोकं जास्त भावनिक असतात त्यांचा मनांवर याचा जास्त प्रभाव पडतो. मुली खूपच भावनिक असतात. या दिवशी चंद्र दिसत नसल्याने शरीरातील हालचाल वाढते. जे माणसं नकारात्मक विचारसरणीचे असतात त्यांच्यावर नकारात्मक शक्ती आपला प्रभाव जास्त पाडते.