
वयाच्या तीस वर्षानंतर तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि इतर पौष्टिक घटकांचा योग्य प्रमाणात समावेश करणे गरजेचे आहे.
हाडांच्या मजबुतीसाठी उपाय : जसजसे वय वाढत जाते तसतसे वयाच्या तीस वर्षानंतर शरीराची हाड निरोगी राहणं गरजेचं आहे. कारण या वयामध्ये तुम्ही सक्रिय असणं फार गरजेचं आहे. सध्या सुरु असलेल्या या युगामध्ये आपण बऱ्याच वेळा बाहेरचं खाणं पसंत करतो. परंतु या वयानंतर हाडे आणि दातांसाठी कॅल्शियमची गरज वाढते. विशेषतः ज्या महिला ३० वर्षानंतर गर्भवती होतात त्यांना कॅल्शियमची जास्त गरज असते, कारण गर्भधारणेदरम्यानही कॅल्शियम आवश्यक असते. महिलांना दररोज १००० मिलीग्राम कॅल्शियमची आवशक्यता असते.
वयाच्या तीस वर्षानंतर तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि इतर पौष्टिक घटकांचा योग्य प्रमाणात समावेश करणे गरजेचे आहे. अशा वेळी आहारामध्ये काही गोष्टीचा समावेश केल्याने आजारांची शक्यता कमी होऊ शकते. आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश केल्याने हाडांचे आरोग्य सुधारले जाऊ शकते आणि आपण दीर्घ आयुष्यासाठी निरोगी राहू शकता.
पनीर
पनीर देखील कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे. शाकाहारी लोक आपल्या आहारात समावेश करू शकतात.
मासे
मासे कॅल्शियमचा चांगला स्रोत असू शकतो. तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे सॅल्मन किंवा सार्डिनसारख्या माशांचा समावेश करू शकता. मासे हा प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा उत्तम स्रोत आहे. याशिवाय खजूर, ब्रोकोली, अंजीर, सोयाबीन आणि दही हे देखील कॅल्शियमचे मजबूत स्रोत आहेत. तुम्ही आहारात या पदार्थांचा समावेश करू शकता.
हिरव्या भाज्या
पालक, मेथी, मोहरीच्या हिरव्या भाज्या आणि केळीची पाने यांसारख्या हिरव्या भाज्या देखील कॅल्शियमचे चांगले स्रोत असू शकतात. दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या पदार्थांचा आहारात समावेश करा.
बदाम
बदामामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे मिश्रण असते, ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. याशिवाय हे प्रथिने, फायबर आणि इतर जीवनसत्त्वांचे पॉवरहाऊस आहे.
तीळ
तिळाच्या बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते आणि तुम्ही ते सॅलड किंवा ब्रेडवर टाकून खाऊ शकता. याशिवाय, तुम्ही स्मूदीमध्ये देखील समावेश करू शकता. हे फायबर आणि प्रथिनांचा देखील एक चांगला स्रोत आहे.