आता ब्लॅकहेड्सची चिंता मिटली, ‘हे’ घरगुती उपाय करतील मोठा परिणाम, वाचा महिती

ब्लॅकहेड्स बहुतांशी नाकाजवळ येतात, जे काढणे फार कठीण असते कारण ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि सहज निघायचं नाव घेत नाहीत. चला असे घरगुती उपाय जाणून घेऊयात,

    अनेकांना विशेषतः तरूणांना त्वचेसंबधी अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सची समस्य संपता संपत नाही. चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचल्यामुळे त्वचेवर लहान दाण्यांच्या रूपात त्वचा निघू लागते आणि हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन काळी पडते. यालाच ब्लॅकहेड्स म्हणतात. हे ब्लॅकहेड्स बहुतांशी नाकाजवळ येतात, जे काढणे फार कठीण असते कारण ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि सहज निघायचं नाव घेत नाहीत. चला असे घरगुती उपाय जाणून घेऊयात, जे आधीच्या काळापासून चालत आलेले आहेत आणि समस्या दूर करण्यात मदत करतात. चला तर मग जाणून घेऊयात,

    घरगुती उपाय

    • बेकिंग सोडा – एका चमचा बेकिंग सोडामध्ये दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि ब्लॅकहेड्सवर लावा. १०-१५ मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. हे एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि चेहऱ्यावरील तेल देखील शोषून घेते.
    • ग्रीन टी- एक चमचा हिरव्या चहाची पाने घ्या आणि पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर २० मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
    • अंड- एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. आता हे मिश्रण ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी लावा आणि १५-२० मिनिटे कोरडे होऊ द्या. शेवटी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
    • केळीचे साल- ब्लॅकहेड्सवर केळीच्या सालीचा आतील भाग चोळल्याने फायदा होतो. हे ब्लॅकहेड्स कमी करण्याचे काम करते.
    • हळद- अँटिऑक्सिडंटने समृद्ध हळद ​​ब्लॅकहेड्सवर प्रभावी ठरते. हळदीमध्ये खोबरेल तेल घाला आणि पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावून ठेवा आणि धुवा. हे आठवड्यातून २ ते ३ वेळा करता येऊ शकते.