
हल्ली बरेच पालक आपल्या मुलांच्या आळशीपणामुळे कंटाळलेले असतात. प्रत्येक कामात (work) टाळाटाळ करणे ही एक सवय सर्व मुलांमध्ये (children) समान दिसून येते. जर वेळीच या सवयी बदलल्या नाही तर, मोठेपणी या सवयी स्वभाव बनून जातात जे मुलांच्या भविष्यात चांगले नसेल.
अशाच काही वाईट सवयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हल्ली पालक आणि शिक्षक (Parents and teachers) या दोघांनाही मुलांचे अभ्यास पूर्ण नसतात, त्यांचे मन एकाग्र होत नाही अशा तक्रारी असतात. तसेच मुलं वेळेवर उठत नाहीत, रात्री उशिरापर्यंत जागे असतात, घरच्या कामांमध्ये मदत करत नाहीत, घरी सांगितलेली कामे करत नाहीत, घराबाहेर खेळायला जात नाहीत आणि नुसते टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसतात या सर्वात जास्त भेडसावणाऱ्या तक्रारी आहेत.
आपल्या मुलांच्या आळशीपणामुळे (laziness) बऱ्याचश्या आया आणि शिक्षकही वैतागलेले दिसून येतात. कोणत्याही कामासाठी टाळाटाळ करणे हे हल्लीच्या मुलांमध्ये कॉमन आहे. याव्यतिरिक्त मुलांचे मॅन एकाग्र होत नसते आणि ना मुलं वेळेवर झोपत असतात किंवा उठत असतात. अशा कितीतरी तक्रारी हल्लीच्या मुलांविषयी ऐकायला मिळतात. त्यासाठी एक पालक म्हणून तुम्ही काय केले पाहिजे , आपल्या मुलांचे मन कसे ओळखले पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एक चांगले पालक म्हणून तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. बहुतेक मुले आपल्या अपेक्षेप्रमाणे वागू शकत नाहीत. अशावेळी पालक आणि शिक्षकांनी लक्षात घ्यायला हवे की, सगळी मुलं सारखी नसतात. म्हणून त्यांच्यावर आपल्या मनाप्रमाणे वागण्याची सक्ती अजिबात करू नये. तसे केले तर भविष्यात मुलांना बऱ्याचश्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यांचा आळस करण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यावर प्रेशर टाकण्याऐवजी ते जे काम करतात त्याविषयी त्यांचे कौतुक करा आणि त्यांना आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या.
आपल्या मुलांचा आळस आणि त्यांची उदासीनता यामागचे नेमके कारण काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांच्या भावनेचा आदर करा आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारून त्याचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे आणि मुलांचे नाते घट्ट व्हायला मदत होईल. आपल्या मुलांसमोर छोटे छोटे लक्ष्य ठेवा. ते त्यांनी पूर्ण केले तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला विसरु नका.