walking

जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या मेटा-विश्लेषणात सात रिसर्चमधून आढळून आले की, जेवणानंतर फक्त दोन मिनिटे चालणे टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी करू शकते. त्याचबरोबर शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी होते.

    मुंबई – जेवण केल्यानंतर लगेच बसणे, पलंगावर किंवा अंथरुणावर झोपल्याने लठ्ठपणाचा धोका वाढतो. कारण त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे जेवणानंतर प्रत्येक वेळी २ मिनिटे चालावे. पूर्वीपासूनच अशी मान्यता आहे की, खाल्ल्यानंतर कमीतकमी १५ मिनिटे चालले पाहिजे.

    जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या मेटा-विश्लेषणात सात रिसर्चमधून आढळून आले की, जेवणानंतर फक्त दोन मिनिटे चालणे टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी करू शकते. त्याचबरोबर शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी होते.
    संशोधनात जेवण केल्यानंतर बसून राहणे किंवा झोपणे आणि पायी चालणे यावरून इन्सुलिन-रक्तातील साखरेची पातळीची तुलना केली आहे.जेवल्यानंतर लगेच झोपणाऱ्यांची साखरेची पातळी अचानक वाढली, जी हळूहळू कमी होत गेली. संशोधनानुसार, १५ मिनिटे चालणे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या आजारांमध्ये फायदेशीर ठरू शकते.