दारूच्या नशेत लोकं अचानक English बोलायला लागतात; कारण जाणून तुम्हालालाही किक बसल्याशिवाय राहणार नाही

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मद्यपान केल्यानंतर लोकं इंग्रजी बोलू लागतात (After drinking, people start speaking English) आणि पूर्ण शुद्धीत असताना तेच लोकं इंग्रजी बोलण्यास कचरतात (They are reluctant to speak English).

    दारू प्यायल्यानंतर (Drink Liquor) लोकांच्या अंगात काय संचारते हे तर देवालाच ठाऊक. अनेकदा तुमच्या निदर्शनास आले असेल की दारूच्या नशेत अनेक लोकांची भाषा बदलते (Language Change). ते त्यांची भाषा सोडून इंग्रजी भाषेत बोलू लागतात (Speak In English Language) किंवा शिवीगाळ करतात. तुम्हाला हे देखील माहिती असेल की, दारू प्यायल्यानंतर लोकं नशेत क्रूर कृत्य करू लागतात किंवा हिंसकही होतात.

    आश्चर्याची गोष्ट म्हणजे मद्यपान केल्यानंतर लोकं इंग्रजी बोलू लागतात (After drinking, people start speaking English) आणि पूर्ण शुद्धीत असताना तेच लोकं इंग्रजी बोलण्यास कचरतात (They are reluctant to speak English). जेव्हा एखादी व्यक्ती दारूच्या नशेत असते तेव्हा सामान्य माणसांच्या तुलनेत तो संकोच न करता इंग्रजीत बोलू शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की दारूच्या नशेत असताना मानव इतर भाषा शिकण्यास तयार असतो. लिव्हरपूल विद्यापीठ (University of Liverpool) आणि नेदरलँड्समधील मास्ट्रिच विद्यापीठातील (Maastricht University in the Netherlands) एका महाविद्यालयातील संशोधकांनी यावर संशोधन केले आहे.

    या संशोधनात हे उघड झाले की, अल्कोहोलचे प्रमाण भाषिक प्राविण्य वाढवण्यास मदत करते. डच भाषा शिकणाऱ्या ५० जर्मन लोकांच्या गटाचा या संशोधनात समावेश करण्यात आला. काही लोकांना साधारण पेयातून थोड्या प्रमाणात अल्कोहोल देण्यात आले. तर काही लोकांना फक्त ज्युस प्यायला देण्यात आला.

    यानंतर, अल्कोहोलयुक्त पेय प्यायल्यानंतर, जर्मन लोकांच्या एका गटाला नेदरलँडच्या लोकांशी डचमध्ये बोलण्यास सांगितले गेले. त्यातून हे उघड झाले की ज्या लोकांच्या पेयात अल्कोहोल दिले गेले त्यांनी योग्य पद्धतीने डच भाषेतील शब्दोच्चार केले. या व्यतिरिक्त, त्या लोकांमध्ये बोलताना भाषेच्या वापर करताना कोणत्याही प्रकारचा संकोच नव्हता.

    दारूच्या नशेत ते लोक डचमध्ये स्पष्ट बोलत होते. या व्यतिरिक्त, ज्या लोकांना अल्कोहोल देण्यात आले नाही ते मात्र बोलताना कचरत होते. त्याही लोकांना थोड्या प्रमाणात अल्कोहोल दिल्यानंतर तेही लोकं काही प्रमाणात डच भाषा निसंकोचपणे बोलू लागले. यावरून असे लक्षात आले की, जरी लोकांना दुसरी भाषा बोलणे अवघड वाटत असले तरी ते दारूच्या नशेत कोणतीही भाषा बोलू शकतात. मात्र अल्कोहोल प्यायल्याने तुमच्या स्मरणशक्तीवर आणि एकाग्रतेवर अतिशय वाईट परिणाम होतो.