
व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हृदयविकाराचा धोका कमी करू शकता. जिम आणि डान्स करताना शरीरामध्ये ऑक्सिजनची मागणी वाढते.
हृदयविकाराचा धोका : हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनानंतर हृदयविकाराच्या संख्येने झपाट्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर आजकाल तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत चालले आहे. २०१६ ते २०२२ या काळामध्ये २० ते ३० वर्ष वयोगटामधील लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढले आहे. जिममध्ये व्यायाम करतानाही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक घटनांमध्ये जागीच मृत्यू झाला आहे. हृदयाच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे हे त्यांचे कारण असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले आहे.
याच परिस्थितीमध्ये व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हृदयविकाराचा धोका कमी करू शकता. जिम आणि डान्स करताना शरीरामध्ये ऑक्सिजनची मागणी वाढते. ज्याचा हृदयावर परिणाम होतो त्यामुळे हृदय वेगाने पंप करू लागते नसांमध्ये रक्तपुरवठा वाढल्याने हृदय योग्यरित्या कार्य करू शकत नाही आणि हृदयाचा झटका येतो. ५० ते ७० टक्के ब्लॉकेज असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक वाढताना दिसते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढतं. आजची जीवनशैली अशी झाली आहे की हृदयविकाराचा झटका कोणत्याही वयामध्ये येऊ शकतो.
व्यायाम करताना ही काळजी घेणे गरजेचे –
अचानक जड व्यायाम करणे टाळा.
नेहमी हलक्या व्यायामाने सुरुवात करा.
व्यायामादरम्यान तुम्हाला अस्वस्थता जाणवत असल्यास, वर्कआउट ताबडतोब थांबवा.
स्टिरॉइड्स घेऊन जड व्यायाम करणे टाळा.
व्यायामा दरम्यान छातीत दुखल्यास हलक्यात घेऊ नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.