रोहित राऊत-जुईली जोगळेकर लग्नाआधी ३ वर्ष होते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, एकत्र राहण्याचे सांगितले कारण..

२०२२ मध्ये जुईली आणि रोहितने लग्न केले. मात्र लग्नापूर्वी दोघांनी तीन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

    सारेगमपच्या मंचावरून रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Julie Joglekar) ही जोडी प्रत्येक घरामध्ये पोहचली. त्यांनी आपल्या गाण्यातून खूप मोठा चाहता वर्ग निर्माण तयार केला आहे. रोहित आणि जुईली लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर त्यांची ओळख वाढत गेली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०२२ मध्ये जुईली आणि रोहितने लग्न केले. मात्र लग्नापूर्वी दोघांनी तीन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाला त्यांच्या पालकांनीसुद्धा परवानगी दिली होती. पण रोहित आणि जुईली लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये का राहिले याचे कारण त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया.

    ‘दिल के करीब’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित राऊत याने सांगितले आहे, लॉकडाऊन लागल्यानंतर आम्ही जुईलीच्या आईवडिलांना फोन केला. मी तिच्या घरी शिफ़्ट होतो असे सांगितले. तिथे २४ तास एकमेकांसोबत राहण्याची सवय लागली. एकमेकांच्या सवयीबद्दल कळलं. सहा महिन्यामध्ये आम्ही पूर्णपणे रुळलो होतो. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे आम्हाला खूप मदत झाली. पुढे जाऊन असं नको म्हणाल्या तू असा असशील किंवा अशी असशील हे माहित नव्हतं, असे रोहितने सांगितले.

    पुढे बोलताना तो म्हणाला, आम्ही घरच्यांना विचारणार होतो की आम्ही लिव्ह इनमध्ये राहू का. तुमच्या तत्वांच्या बाहेर वाटत असेल तर आपण दुसरा पर्याय शोधू या. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले की आम्ही तीन वर्षे लागणार आहेत. तीन वर्षांनंतर आम्ही ठरवू की आम्हाला लग्न करायचे आहे की नाही. आई बाबांना कळलं होत की आम्ही हे खूप विचार करून बोलत आहोत. त्यामुळे ते सुद्धा तयार झाले. ब्रेकअप होणं वेगळं आणि घटस्फोट घेणं वेगळं. त्यामुळे तुम्ही सहा महिने तरी एकत्र राहून बघा. खरंच तुम्हाला या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचंय का, असे सांगत रोहित राऊत याने सांगितले.