स्वयंपाकापूर्वी गॅस शेगडीला स्पर्श करून म्हणा ‘हा’ मंत्र; अन्नपूर्णा राहील सदैव प्रसन्न

    घरातील गृहलक्ष्मीने स्नान आटोपून हा एक उपाय नक्की करावा, घरात पैस्यांची तंगी कधीच जाणवणार नाही. गृहलक्ष्मी म्हणजेच आपल्या घरातील स्त्री. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व अन्नपूर्णा मातेचा कृपाआशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आपल्या स्वयंपाक घरात असलेल्या गॅस शेगडीला स्पर्श करून आपण हा एक मंत्र नक्की म्हणावा यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरावर सदैव प्रसन्न राहील.

    अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने घराची भरभराट होऊ लागेल. हा मंत्र नक्की कोणता आहे आणि त्याची विधी काय आहे ते आपण जाणून घेऊया. गृहलक्ष्मीने सकाळी उठल्यानंतर स्नान आदी आटोपून आपल्या स्वयंपाकघरात जावे, तुपाचा एक दिवा प्रज्वलित करावा.

    आपण गॅस शेगडीच्या जवळ हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण थोडीशी चिमूठभर हळद  शेगडी वरती शिंपडायची आहे. आणि त्यानंतर आपण आपले दोन्ही हात शेगडी वरती ठेवून शक्यतो सकाळी अजून शेगडी गरम नसते म्हणून असे दोन्ही हाथ आपण गॅस वरती ठेवून हा मंत्र म्हणायचं आहे.

    मंत्र आहे देहि सौभाग्यमारोग्यम देहि मे परम सुखम । रूपं देहि जयं देहि यशो वेहि द्विषो जाहि ।। हा मंत्र आपण कमीत कमी ३ वेळा नंतर तुम्ही तो मी ७ वेळा ९ वेळा इत्यादी वेळा आपण बोलू शकता वेळ नसेल तर केवळ एकदा बोलला तरी तुम्हाला अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात. माता अन्नपूर्णेचा कृपाआशीर्वाद आपल्याला मिळतो. हा उपाय आहे. याशिवाय झोपण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट आपल्या किचनमध्ये रात्री खरकटी भांडी ठेवू नका.

    शेगडी स्वच्छ पुसून ठेवा. त्यावर कुठेही खरकटे  नसेल याची काळजी घ्या. एकंदरीतच किचन स्वच्छ असायला हवे. यामुळे वास्तुदोष निर्माण होत नाहीत.  रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे दोन चार थेंब शेगडी वरती शिंपडा कच्चे दूध शक्यतो वापरावे म्हणजेच न तापवलेले दूध अश्या गाईच्या दुधाचे थेंब शिंपडल्याने घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष नाहीसे होतात.

    स्वयंपाकघरातील वास्तुदोष नाहीसे होऊन घराची भरभराट होऊ लागते. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, जर घरात महिला नसतील तर पुरुषसुद्धा हा उपाय करू शकतात.

    (वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रध्येही संबंध जोडू नये.)