यंदा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लग्नासाठी किती मूहूर्त शुभ आहेत ते पाहा?

    दिवाळीनंतर तुळशी विवाह झाला की लग्नसराईला सुरुवात होते. अनेकजण तुळशी विवाहानंतर लग्न मुहूर्त बघायला सुरूवात करतात. तुम्हीही नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत लग्न करायचा विचार करत असाल तर नोव्हेंबर महिन्यात लग्नाचा पहिला मुहूर्त २४ नोव्हेंबरला आहे. या दिवशी गुरुवार दिवस येतो. सकाळी ६.५१ मिनीटापासून ते सायंकाळी ७.३७ मिनीटपर्यंत हा मुहूर्त आहे. तसेच दुपारी १२.२० पासून ते २५ नोव्हेंबरला सकाळी ८.४४ मिनीटापर्यंत सुकर्मा योग आहे. या दिवशी उशीरापर्यंत म्हणजेच ७.३७ मिनीटापर्यंत अनुराधा नक्षत्र योग असेल. यानंतर ज्येष्ठ नक्षत्र सुरू होईल.

    नोव्हेंबर मध्ये ४ मुहूर्त आहेत. २५ नोव्हेंबर शुक्रवार, २६ नोव्हेंबर शनिवार, २७ नोव्हेंबर रविवार आणि २८ नोव्हेंबर सोमवारला असेल. तर डिसेंबर महिन्याबाबत बोलायचं झाल्यास या महिन्यातही चार शुभ मुहूर्त आहेत. २ डिसेंबर शुक्रवार, ७ डिसेंबर बुधवार, ८ डिसेंबर गुरुवार आणि ९ डिसेंबर शुक्रवार असे चार मुहूर्त असतील.