गोवर रोखण्यासाठीही क्वारंटाईन सेंटर उभारा; टास्क फोर्सचे आदेश

मार्च २०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. आता पुन्हा क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे. मात्र ते गोवर या आजारासाठी असणार आहे. सध्या राज्यात गोवर या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत.

    मुंबई – राज्यभरात गोवरची (Measles) लागण झालेल्यांची संख्या ६५८ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण (Isolation) व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन (District Administration) आणि महापालिकांना (Municipal Corporation) देण्यात आले आहेत. राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. रविवारी गोवर रुग्णांची संख्या १० हजार ५४४ वर पोहोचली आहे.

    मार्च २०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. आता पुन्हा क्वारंटाईन सेंटर (Quarantine Center) उभारण्यात येणार आहे. मात्र ते गोवर या आजारासाठी असणार आहे. सध्या राज्यात गोवर या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने (Task Force) लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत.

    गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवावे, असे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयीन व्यवस्था करण्याचे निर्देही टास्क फोर्सने दिले आहेत. तसेच, कुपोषित बालकांना गोवर आजाराची लागण झाली असेल, तर त्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक असते; अन्यथा त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्व ‘अ’चा डोस द्यावा, असे निर्देशही टास्क फोर्सने प्रशासनाला दिले आहेत.