भारती सिंगने आजाराबद्दल व्हिडिओ शेअर करत दिली माहिती, ही ५ लक्षणे दिसताच रुग्णालयात लगेच धाव घ्या

तीन दिवसांआधी भारतीची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.

  भारती सिंग (Bharti Singh) ही भारतीय चित्रपट सृष्टीतील विनोदी कलाकार म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर भारतीचा मोठा चाहता वर्ग असल्याने सगळीकडे प्रसिद्ध आहे. मात्र काही दिवसांपासुर्वी कॉमेडियन भारती सिंगची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतीने आपल्या आजाराबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. तीन दिवसांआधी भारतीची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. मात्र भारतीला नेमकं काय झालं होत याबाबत तिने व्हिडिओ शेअर करत खुलासा केला आहे.

  भारती सिंगच्या काही दिवसांपासून सतत पोटात दुखत होते. तिला वाटलं अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यामुळे तिने सर्व चाचण्या करून पहिल्या. या चाचण्यांमध्ये भारतीला पित्ताशयात खडे झाल्याचे व काही खडे हे शिरेत अडकल्याचे निदान झाले. भारतीने काही खाल्लं किंवा प्यायलं तरी तिला उलट्या आणि पोट दुखी व्हायची. सुरुवातीला तिला असे वाटले की हा गॅस्ट्रिक किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे. पण चाचण्या केल्यानंतर तिची ही समस्या उघड झाली. पित्ताशयात दगड असल्याने तिच्या सतत पोटामध्ये दुखत होते. यकृतातून बाहेर पडणारा पित्त द्रव गोळा होतो, ज्याचे कण जमा होऊन दगड बनतात.यामुळे भारतीला मोठ्या प्रमाणावर पोट दुखी होत होती.

  पित्ताशयातील खड्यांची लक्षणे

  • पित्ताशयातील खड्यांची मुख्य लक्षणे म्हणजे सतत पोटामध्ये दुखणे.
  • मळमळ-उलट्या
  • ताप, त्वचा आणि डोळे पिवळसर होणे.
  • तपकिरी लघवी किंवा हलक्या रंगाचे मल येणे.

  यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात. जेव्हा पित्त द्रवामध्ये उच्च कोलेस्ट्रॉल, बिलीरुबिन किंवा कमी पित्त क्षार असते तेव्हा ते पित्त मूत्राशयात जमा होऊ लागते. त्यानंतर ते लहान दगडांचे रूप घेऊ शकतात.

  किडनी स्टोनवर उपाय

  • पित्ताशयातील खडे फोडण्यासाठी सफरचंदाचा रस वापरतात.
  • सफरचंदाचा रस दगडांना मऊ करण्यास आणि ते काढून टाकण्यास मदत करतो.
  • ऍपल सायडर व्हिनेगर बहुतेकदा शरीर डिटॉक्स करण्यासाठी वापरले जाते. हे पित्ताशय स्वच्छ करण्यास देखील मदत करू शकते.
  • ज्या व्यक्तींना पित्ताशयातील खड्यांचा त्रास असेल अशांनी आपल्या आहारामध्ये बिया असलेल्या फळे किंवा भाज्यांचा समावेश करू नये. यामध्ये टोमॅटो, भेंडी, वांग या भाज्या खाऊ नये.
  •  दररोज कमीत कमी ६ ते ७ लिटर पाणी प्यावे.