धक्कादायक! पालकांनो, मुलांना वेळीच आवरा, अन्यथा…सोशल मीडियामुळे मुलांचा ‘निद्रानाश’; मित्रांसाठी होतेय जागरण

झोप न येण्यामागे मोबाईल फोन (MobilePhone) हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अभ्यास १० वर्षांच्या ६० शालेय विद्यार्थ्यांवर करण्यात आला.

  • ब्रिटनच्या शाळांमधील सर्वेक्षणातील माहिती

लंडन, वृत्तसंस्था. उत्तम झोप (Best Sleep) हेच उत्तम आरोग्याचे (Good Health) रहस्य आहे. पण आजच्या काळात लोकांचे जीवन असे झाले आहे की, रात्री चांगली झोप मिळणे खूप कठीण आहे. मग ती कोणत्याही वयाची व्यक्ती असो.

आजकाल सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे (Excess use of social media) मुलांची रात्रीची झोप उडाली आहे. डी मॉन्टफोर्ड युनिव्हर्सिटीच्या(D Montford University) जॉन शॉ (John Shaw) यांच्या नेतृत्वाखाली लिसेस्टरच्या शाळांमध्ये केलेल्या अभ्यासात (Survey) मुलांच्या झोपेबाबत मोठ्या प्रमाणात खुलासा झाला आहे.

मोबाईल फोन हेच मुख्य कारण

झोप न येण्यामागे मोबाईल फोन (MobilePhone) हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अभ्यास १० वर्षांच्या ६० शालेय विद्यार्थ्यांवर करण्यात आला. त्यापैकी बहुतेकांकडे सोशल मीडियाची सोय उपलब्ध होती.

यातील ६९ टक्के मुलांनी सांगितले की, ते दिवसातून चार तास मोबाईल फोन वापरतात आणि सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यापैकी ८९ टक्के लोकांनी स्वत:चा स्मार्टफोन असल्याचे मान्य केले. सुमारे ५५ टक्के मुले टॅब्लेट वापरतात आणि २३ टक्के मुले लॅपटॉप वापरतात.

संशोधनात असेही आढळून आले की मुले वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःला व्यस्त ठेवतात. त्यापैकी व्हीडिओ शेअरिंग ॲप टिक-टॉक आहे. ५७ टक्के लोकांनी फोटो शेअरिंग साइट इन्स्टाग्राम, १७ टक्के रेडिट फोरम आणि २ टक्क्यांहून कमी लोकांनी फेसबुकचा वापर केला. मुलांना वेळेचे भान राहत नाही.

सोशल प्लॅटफॉर्मवर मुले इतकी सक्रिय का असतात?

संशोधनात असे आढळून आले की मुले त्यांचे मित्र काय करत आहेत याची चिंता करतात. त्यांना मित्रांची सर्व माहिती ठेवायची असते. दोन तृतीयांश लोक झोपण्यापूर्वी सोशल मीडियाचा वापर करतात, असेही संशोधनात आढळून आले आहे.