तुम्ही परफ्युम वापरता? वासासाठी जीव धोक्यात घालू नका, लक्षात ठेवा हे भयंकर परिणाम

परफ्युम सातत्यानं वापरणाऱ्या व्यक्तींना कॅन्सरसह इतर अनेक प्रकारच्या आजारांचा धोका उद्भवू शकतो, असं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून सिद्ध झालंय. परफ्युम तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात येतो. यातील अनेक रसायनं ही त्वचेसाठी चांगली नसतात. मात्र परफ्युमवाटे या रसायनांचा त्वचेशी संबंध येतो आणि त्यातून अनेक प्रकारचे त्वचारोग होऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिलाय.

  आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये आणि वातावरण फ्रेश राहावं, यासाठी अनेकजण वेगवेगळ्या परफ्युमचा वापर करतात. दिवसातून अनेकदा परफ्युम अंगावर फवारण्याची सवय अनेकांना असते. मात्र ही सवय तुमच्या अंगलट येऊ शकते.

  परफ्युम सातत्यानं वापरणाऱ्या व्यक्तींना कॅन्सरसह इतर अनेक प्रकारच्या आजारांचा धोका उद्भवू शकतो, असं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून सिद्ध झालंय. परफ्युम तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात येतो. यातील अनेक रसायनं ही त्वचेसाठी चांगली नसतात. मात्र परफ्युमवाटे या रसायनांचा त्वचेशी संबंध येतो आणि त्यातून अनेक प्रकारचे त्वचारोग होऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिलाय.

  हे सुद्धा वाचा

  आपण वापरत असलेल्या परफ्युममध्ये रासायनिक द्रव्यं कुठली आहेत आणि त्यांचा आपल्या त्वचेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, याची माहिती नागरिकांनी घेणं गरजेचं आहे. परफ्युमच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

  • डिओतील सिंथेटिक पदार्थांमुळे त्वचेची हानी
  • हार्मोन्सचं असंतुलन होण्याची शक्यता
  • त्वचेची ऍलर्जी
  • चिडचीड होणे
  • एकाग्रतेवर परिणाम
  • मेंदूची कार्यक्षमता कमी होणे
  • नवजात बालकाला आईच्या दुधावाटे त्रास होण्याची शक्यता