कार्तिक पौर्णिमेला धनप्राप्तीसाठी ‘हे’ उपाय

    यंदा कार्तिक पौर्णिमा 8 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी उत्तर भारतीय देव दीपावली देखील साजरी करतात. देव दीपावली किंवा त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त सारा परिसर दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघतो.

    कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता. अशी पुराणकथा आहे. या राक्षसाच्या वधानंतर भगवान श्री शंकर यांची ओळख त्रिपुरारी झाली. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पूजेचे सुद्धा महत्व आहे. ते सहा कृत्तिकांचे प्रिय पुत्र होते, अशी धारणा आहे. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजन केल्यास भगवान शंकर व त्यांच्या परिवाराची कृपा आपल्यावर राहते.

     

    कार्तिक पौर्णिमेदिवशी धनलाभ व्हावा म्हणून काय कराल?

    • कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय यांची मनोभावे पूजा करा. हा दिवस कार्तिकेयाचा जन्म दिवस असतो असे देखील मानले जाते.
    • कार्तिक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करा, यामुळे घरात सुख, शांत आणि समृद्धी नांदण्यास मदत होते.
    • पौर्णिमेच्या दिवशी गरिब व्यक्तीला पांढऱ्या वस्त्रासह दूध, मिठाई व तांदूळ यांचे दान करा. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.
    • लक्ष्मी सोबतच चंद्रास तांदळाच्या खीरीचा नैवेद्य दाखवा यामुळे माता लक्ष्मी चा आशिर्वाद कायम राहतो.
    • पिंपळाच्या झाडाची पूजा करा.उत्तर भारतामध्ये कार्तिक पौर्णिमा या दिवशी देव दिवाळीही साजरी केली जाते.
    • दिवाळीप्रमाणे घर सजवले जाते. दिवे लावले जातात. यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला कधीही पैशांची कमी भासणार नाही. अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.