snake massage in egypt spa

शरीराचा थकवा दूर करण्यासाठी लोक मसाज करतात, पण तुमचा मसाज माणसाने नाही तर सापाने केला तर? होय हे खरे आहे. इजिप्तची राजधानी कैरो येथील एका स्पामध्ये असेच घडत आहे(snake massage in egypt ). येथील स्पाने हाताने मसाज करण्याऐवजी सापाद्वारे मसाज केला जातोय.

    या मसाजला ‘स्नेक मसाज’ म्हटले जात आहे. कैरोमध्ये होत असलेल्या या स्नेक मसाजमध्ये व्यक्तीच्या अंगावर डझनभर साप सोडले जातात आणि नंतर साप व्यक्तीच्या अंगावर रेंगाळतात. सापाच्या मसाजदरम्यान बरेच लोक खूप घाबरतात. पण, मसाजमध्ये वापरले जाणारे साप विषारी नाहीत. बिगर विषारी सापांच्या मदतीनेच ही मसाज केली जाते, त्यामुळे या सापांपासून कोणताही धोका नाही.

    सुरुवातीला लोकांना या सापांची भीती वाटली तरी हळूहळू सवय होऊ लागते. हे साप अंगावर रेंगाळल्यावर स्नायूंना आराम मिळतो. उल्लेखनीय म्हणजे ह्रदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांना मसाज न करण्याच्या सूचना दिल्या जातात.

    सापाच्या मसाजमुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो असा कैरो स्पाचा दावा आहे. याशिवाय शरीरातील रक्ताभिसरण वाढते. सुमारे अर्धा तास सापाची मालीश केली जाते. सर्व प्रथम व्यक्तीच्या पाठीवर तेल ओतले जाते आणि मालीश केली जाते. यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीवर साप सोडले जातात.