कापून ठेवलेलं सफरचंद काळे पडू नये म्हणून काही खास टिप्स…

  स्वयंपाक करत असताना अनेक सोप्या ट्रिक्स वापरल्या जातात. पाककलेतील शॉर्टकट हे काम आणखी सोपे करण्यासाठी उपयोगी पडतात. विशेषत: तुम्हाला काहीवेळा एखाद्या कामात घाई असेल तर तुम्ही या टिप्स वापरू शकता. स्वयंपाकघरातील अशा अनेक टिप्स तुमचे काम सोपे करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

  किचन टिप्स –

  • सफरचंद कापल्यानंतर ते तपकिरी होऊ नये म्हणून कापलेल्या भागावर थोडासा लिंबाचा रस लावा. त्यामुळे सफरचंद अधिक काळ टिकेल आणि ताजेतवानेही दिसेल.
  • फळे आणि भाज्या जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी, फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांना वर्तमानपत्रात गुंडाळा.
  • कापलेला सफरचंद हा जास्त वेळ ठेवू नका तो जेव्हढा लवकर खाता येईल तेवढ खा.
  • सफरचंद  कापल्यावर तो डब्यात ठेवाव, उघड्यावर ठेवू नका.

  तसेच काही भाज्या देखील चिरल्यावर काही वेळातट काळे पडू लागतात, त्यासाठी काही खास टिप्स

  • भाज्या सोलण्यापूर्वी किंवा चिरण्यापूर्वी धुवाव्यात. कापल्यानंतर भाज्या धूवु नयेत.
  • बटाटे आणि वांगी चिरल्यानंतर पाण्यात भिजत ठेवा. जेणेकरून त्यांचा रंग खराब होणार नाही. किंवा ती काळी पडणार नाहीत.
  • भाज्या पाण्यात उकळल्यानंतर ते पाणी फेकून देऊ नका, त्याचा वापर त्या भाजीच्या ग्रेव्ही बनवण्यासाठी करा.
  • फ्रिजमध्ये मलमली किंवा सुती कापडाच्या पिशवीत कोथिंबीर ठेवा. यामुळे ती अधिक काळ ताजी, टवटवीत राहील.
  • हिरव्या मिरच्यांचे देठ काढून टाका, यामुळे हिरवी मिरची जास्त काळ टिकेल.
  • कांदा सोलल्यानंतर तो अर्धाच कापून घ्या आणि चिरण्यापूर्वी सुमारे 10 मिनिटे पाण्यात भिजवा. जेणेकरून कांदा चिरताना तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही.
  • एक कप उकळत्या पाण्यात बदाम 10 मिनिटे भिजत ठेवा. यामुळे त्याची साल सहज निघून जाईल आणि त्याचा वापर करता येईल.
  • धारदार चाकू आणि लाकडी चॉपिंग बोर्ड वापरून भाज्या चिरणे सोपे आहे.
  • संगमरवरी स्लॅबवर कापल्याने तुमच्या चाकूची धार खराब होण्याची शक्यता असते.
  • फळे आणि भाज्या जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी, फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांना वर्तमानपत्रात गुंडाळा.
  • वाळलेल्या फळांचे तुकडे करण्यापूर्वी तासभर गोठवून ठेवा आणि नंतर कापण्यापूर्वी चाकू गरम पाण्यात बुडवा.