spa offers snake massages in egypt video viral nrvb
अरे बापरे ! कधी 'स्नेक मसाज' अनुभवलाय का ? पाठीवर सोडले जातात अजगरासारखे २८ साप

राजधानी काहिरा येथील एका स्पा मध्ये अशा प्रकारची सेवा लोकांना मिळते आहे ज्यात लोकांना विविध प्रकारच्या मालिशच्या प्रकारांपैकी स्नेक मसाजची निवड करण्याची मुभा आहे. यात बिनविषारी सापांचा उपयोग करण्यात येतो.

मसाज केल्याने शरीराला आराम मिळतो पण तुम्ही कधी स्नेक मसाज म्हणजेच सापांकडून स्वत:च्या शरीराची मालिश करून घेतलीये. तुम्ही म्हणाल, सापांकडून शरीराची मालिश एवढी कोणाची मजल गेलीये पण हे खरोखर सत्य आहे. मिस्त्रमध्ये एका स्पामध्ये लोकांना स्नेक मसाज दिला जातो आणि असा दावाही करण्यात येतोय यामुळे शरीराला खूपच आराम मिळतो आणि शरीराचं दुखणंच दूर पळून जातं.

राजधानी काहिरा येथील एका स्पा मध्ये अशा प्रकारची सेवा लोकांना मिळते आहे ज्यात लोकांना विविध प्रकारच्या मालिशच्या प्रकारांपैकी स्नेक मसाजची निवड करण्याची मुभा आहे. यात बिनविषारी सापांचा उपयोग करण्यात येतो.

स्पा मध्ये, जिवंत साप लोकांच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर सोडले जातात. यामुळे लोकांच्या शरीराला होत असलेल्या वेदना कमी होतात आणि त्यांना आराम मिळतो. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या व्हिडिओनुसार मालिश करणारे ग्राहक पहिल्यांदा पाठीला तेल लावतात आणि त्यानंतर ३० मिनिटांच्या सत्रात अजगर आणि २८ विभिन्न प्रकारचे बिनविषारी साप शरीरावर सोडले जातात. स्नेक मसाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.

spa offers snake massages in egypt video viral nrvb

स्नायू आणि हाडांची दुखणी कमी करण्यासोबतच शरीरातील रक्त वाहिन्यांमधील प्रवाह सुरळीत राखण्यासही मदत होते असं स्पा चे मालक सफवत सेडकी यांनी स्पष्ट केले.

स्नेक मसाज दरम्यान जेव्हा माझ्या पाठीवर साप सोडले त्यानंतर माझ्या शरीराला खूपच आराम वाटला आणि माझं दुखणही गायब झालं. मी प्रथम घाबरलो होतो की, माझ्या शरीरावर अनेक प्रकारचे साप फिरत आहेत. पण थोड्या वेळाने भिती, चिंता आणि ताण कमी झाला. सत्र संपल्यानंतर माझा आत्मविश्वासही वाढला आहे असं एक ग्राहक दीया ज़ीन याने सांगितलं.