
२४ जानेवारी घटना
१९८४: ऍपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.
१९७६: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL असे करण्यात आले.
१९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.
१९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शीखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभानिधन झाले.
१९४३: पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.
१९४२: दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.
१९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.
१९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
१८६२: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.
१८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
१८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले.
२४ जानेवारी जन्म
१९४३: सुभाष घई – हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
१९२४: कापुरी ठाकूर – बिहारचे ११वे मुख्यमंत्री (निधन: १७ फेब्रुवारी १९८८)
१९२४: रतन साळगावकर – मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: २३ ऑगस्ट १९७१)
१९२४: हंसा वाडकर – मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: २३ ऑगस्ट १९७१)
१९२४: मेघश्याम रेगे – तत्त्वचिंतक (निधन: २८ डिसेंबर २०००)
२४ जानेवारी निधन
२०११: पंडित भीमसेन जोशी – भारतीय शास्त्रीय गायक स्वरभास्कर – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)
२००५: अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम
१९६६: होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ – पद्म भूषण (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९)
१९६५: विन्स्टन चर्चिल – ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार – नोबेल पुरस्कार (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)
१९१९: इस्माईल क्यूम्ली – अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ ऑक्टोबर १८४४)
१८७२: विल्यम वेबल एलिस – रग्बी फुटबॉलचे निर्माते (जन्म: २४ नोव्हेंबर १८०६)